Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साहित्य, वाचन संस्कृती व संवर्धनासाठी ग्रंथ भेट

वाचन प्रेरणा दिन उत्साहात : ग्रंथालय मित्रमंडळाला दिली पुस्तके

राहुरी ः मोबाईल व इंटरनेटच्या जमान्यात वाचन संस्कृती कमी होत चालल्याची ओरड केली जात आहे. तरुण पिढी वाचतच नाही. अशी चिंता व्यक्त करत, चर्चासत्र, प

राहुरी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकारण तापले
तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा जप्त l DAINIK LOKMNTHAN

राहुरी ः मोबाईल व इंटरनेटच्या जमान्यात वाचन संस्कृती कमी होत चालल्याची ओरड केली जात आहे. तरुण पिढी वाचतच नाही. अशी चिंता व्यक्त करत, चर्चासत्र, परिसंवाद घेऊन दीर्घ चिंतन केले जाते. तथापि प्रत्यक्ष कृती क्वचितच दिसते. प्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार सतीश डेरेकर आणि लेखिका, चित्रकार ज्योती डेरेकर यांनी वाचन संस्कृती जतन व संवर्धनासाठी, वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून युवाग्राम विकास संस्थेच्या ग्रंथालय मित्रमंडळाला मौलिक ग्रंथ भेट देत, आदर्श घालून दिला आहे. युवाग्राम संस्थेच्या ’ग्रंथालय मित्र मंडळ’ उपक्रमाचे संचालक संभाजी पवार यांनी ही ग्रंथभेट स्वीकारली. साहित्य, राजकारण, समाजकारण तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा अनेक संग्रह्य ग्रंथांचा यात समावेश आहे.
 ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यापासून, थेट भटक्या विमुक्तांच्या पालावर मोफत पुस्तके उपलब्ध करून देणार्‍या, राहुरी तालुक्यातील कदमराव पवार सार्वजनिक वाचनालयाला हे ग्रंथदान देण्यात आले. यावेळेस बोलताना साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार सतीश डेरेकर म्हणाले की, अनेक पुस्तके लिहिली, वाचली, विकत घेतली. आज वाचन कमी होत चालले आहे. अशी तक्रार करण्यापेक्षा माझी साहित्यिक,चित्रकार पत्नी ज्योती डेरेकर’ने पुढील पिढीने वाचन संस्कृतीचे जतन करावे, स्पर्धा परीक्षेसाठी विविध विषयांचे ज्ञान वाढवण्यासाठी उपयोग व्हावा. तसेच ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना प्रबोधनात्मक पुस्तके वाचण्यास मिळावी, या हेतूने श्री कदमराव पवार सार्वजनिक वाचनालय हे ग्रंथ दिले आहेत. मोबाईल आणि इंटरनेटच्या सध्याच्या जमान्यात वाचन संस्कृती कमी होत चालल्याची ओरड केली जाते. नकारात्मक सूर लावत बसण्यापेक्षा, सकारात्मक पावले टाकून वाचन संस्कृती वाढीस लावण्यासाठी अमेरिकेतील ’फ्रेंड्स ऑफ लायब्ररी’च्या धर्तीवर ग्रंथालय मित्र मंडळ हा उपक्रम सुरू केल्याची माहिती संभाजी पवार यांनी दिली. साहित्य व वाचन संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी ग्रंथालय मित्रमंडळामध्ये साहित्यप्रेमी, चोखंदळ वाचक, ग्रंथविक्रेते, प्रकाशक, ग्रंथपाल, ग्रंथालय आधी घटकांना बरोबर घेऊन, सुरुवातीला नगर जिल्हापुरती असणारी ही चळवळ महाराष्ट्रभर राबविली जाणार आहे. ’ग्रंथदान सेवा, हीच ईश्‍वर सेवा’ मानून, ग्रंथालयांचे बळकटीकरण करण्याची गरज असून, भावी पिढी बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ होण्यासाठी, ग्रंथदान करण्याचे आवाहन आदित्य पवार यांनी यावेळी केले.

COMMENTS