मंगळवेढा सिंचन योजनेस लवकरच मान्यता देणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंगळवेढा सिंचन योजनेस लवकरच मान्यता देणार

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस अधिवेशन संपल्यानंतर स

‘मला मामी हाक मारल्यावर फारच मज्जा येते’
Nagpur : गणेशपेठ आगारातील कर्मचारी संपात सहभागी… | ST Bus Strike | Maharashtra News (Video)
दुकान फोडीतील सराईत गुन्हेगार जाळ्यात; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस अधिवेशन संपल्यानंतर सात दिवसांत मुख्यमंत्री यांची मान्यता घेऊन त्यानंतर सात दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मंगळवेढा तालुक्यातील 35 तालुक्यातील 11 गावांचा समावेश म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात झाला आहे उर्वरित 24 गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेस लवकरच मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. आवश्यक असणाऱ्या सर्व मान्यता घेण्यात येतील.
सदस्य समाधान आवताडे याबाबतच्या चर्चेत सहभागी झाले.

COMMENTS