Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘बाईपण भारी देवा’ पाहून क्रिकेटच्या देव देखील भारावला

मुंबई प्रतिनिधी - केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने चाहत्यांवर अक्षरशः गारुड केलं आहे. फक्त महिलाच नाही, तर पुरुष वर्ग देखील

शरद पवार यांना कोरोनाची लागण
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचं तांडव
केडगाव देवीमंदीर परिसरातून लहान मुलाचे दागिने चोरण्याचा प्रयत्न 

मुंबई प्रतिनिधी – केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने चाहत्यांवर अक्षरशः गारुड केलं आहे. फक्त महिलाच नाही, तर पुरुष वर्ग देखील ‘बाईपणाची गोष्ट’ डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींच्या कोटी उड्डाणे घेतल्याचे सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. ६ बहिणींची कथा अनेकांना आपल्या घरची असल्याचे वाटत आहे. या चित्रपटाची भुरळ ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरला देखील पडल्याचे पाहायला मिळत आहे. सचिनने द्वीट करत या चित्रपटाबद्दल कौतुक केले आहे. आई आणि मावशी कधी हा चित्रपट बघतील, असं झाल्याच्या भावना सचिनने यावेळी व्यक्त केल्या आहेत. तर अभिनेत्री दीपा परबला सचिनने व्हिडिओ कॉल करुन शुभेच्छा देखील दिल्याचे बघायला मिळत आहे. “जवळ येण्यासाठी वेगळ व्हावं लागतं… ‘बाईपण भारी देवा’ ही ६ बहिणींची हृदयस्पर्शी कथा आहे. हा मराठी सिनेमा बघत असताना मी खूप धमाल केली आहे. आता माझ्या आई आणि मावशीने देखील तो बघावा, याची मी आतुरतेने वाट बघत आहे.

तसेच या चित्रपटातील कलाकारांना भेटणं हा एक सुंदर अनुभव होता!” अशा आशयाचं ट्रीट सचिनने यावेळी केले आहे. रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर आणि सुकन्या मोने यांच्याबरोबरच फोटो त्याने यावेळी शेअर केल्याचे पाहायला मिळाले आहे. या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला अभिनेत्री दीपा परब-चौधरी हिने उपस्थिती दर्शवली नव्हती. यामुळे दीपाला व्हिडिओ कॉल करण्यात आला. सचिनने दीपाशी गप्पा मारले आहे. “ओह शी इज द सेम गर्ल… हेलो… खूप आवडला सिनेमा. काँग्रॅच्युलेशन्स. भेटुया आपण नक्की. मी अजितला सांगेन.. माझ्या बाजूलाच आहे. मी सांगेन, नक्की भेटुया… ऑल द बेस्ट” अशा गॉड शब्दात सचिनने दीपाचं तोंड भरून कौतुक केले आहे. सचिनबरोबर व्हिडीओ कॉलवर बोलत असताना ती हरखून गेल्याचे पाहायला मिळाले आहे. तिने आपल्या भावना इन्स्टाग्रामवर देखील पोस्ट केली आहे. सचिन… द सचिन तेंडुलकर… लाखो-करोडो चाहते आहेत त्यांचे, मी देखील त्यांच्यापैकीच एक. त्यांची भेट होणं… ही माझ्यासाठी खरंच एक फॅन मोमेंट आहे. ‘बाई पण भारी देवा’ या सिनेमाने खरंच आम्हाला भरपूर काही दिले आहे, परंतु सचिन तेंडुलकर येऊन सिनेमा बघतील. त्यांना तो आवडेल आणि त्याचं ते इतकं गोड कौतुक देखील करतील याचा आम्ही कोणीही स्वप्नांत देखील विचार नव्हता केला. शब्दांत न मांडता येणारा पण आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेलेला हा एक अस्मरणीय तो क्षण आहे. सिरियलची शूटिंग मध्ये कायम व्यस्त असल्याने मला प्रत्यक्ष स्क्रीनिंगला जाता आले नसल्याची भावना यावेळी तिने व्यक्त केली आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये एकदा तरी भेटायची इच्छा होती, त्याला भेटण्याची संधी समोरून चालून आली असता, मी ती संधी हातून घालवले असताना मला व्हिडीओ कॉल येतो… आणि प्रत्यक्ष सचिन तेंडुलकर यांच्याशी संवाद साधला जातो… आम्हा सर्व जणींचा अभिनय, हा सिनेमा त्यांना आवडला हे ऐकून खूप मस्त वाटलं… अजून देखील हे सर्व काही स्वप्नवतचं असल्याचे अनुभवायला मिळत आहे. THANK YOU @saneness आणि अजित भुरे आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या या एका अविस्मरणीय फोन साठी धन्यवाद अशी पोस्ट तिने यावेळी केली आहे..

COMMENTS