विखेंचे बॅलन्सशीट तपासण्याची वेळ आता आली आहे… तनपुरेंचा सूचक इशारा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विखेंचे बॅलन्सशीट तपासण्याची वेळ आता आली आहे… तनपुरेंचा सूचक इशारा

नगर -दि 16 प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटीची मदत जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हा भाजपने या

अहमदनगर क्लबवर एकता पॅनलचे वर्चस्व ; सचिवपदी नरेंद्र फिरोदिया
सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा ः संधान
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज टाकणाऱ्या एका विरुद्ध गुन्हा दाखल 

नगर -दि 16 प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटीची मदत जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हा भाजपने या मदतीसाठी उपोषणाची स्टंटबाजी व नौटंकी केली, सकाळी नाश्ता करून आले व दुपारी लगेच जेवायला गेले, त्यांना जर शेतकऱ्यांचा कळवळा होता तर त्यांनी किमान एक दिवस तरी उपोषण करायचे असा टोला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी येथे लगावला.

 नगर तालुका वीज पुरवठा आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व शेतकऱ्यांसाठी जिल्हा भाजप तसेच खासदार, आजी-माजी आमदार उपोषण करणार म्हटल्यावर त्यांना भेटून वस्तुस्थिती सांगून त्यांचे उपोषण सोडवायची माझी इच्छा होती, परंतु मी त्यांच्यापर्यंत येण्याआधीच ते जेवायला निघून गेले होते त्यांनी किमान शेतकऱ्यांचा कळवळा म्हणून एक दिवस तरी पोटाला चिमटा घ्यायला हवा होता, अशा उपोषणकर्त्यांपेक्षा सामान्य कार्यकर्ते तरी बरे, असा टोला लगावून तनपुरे म्हणाले, ही सर्व स्टंटबाजी व नौटंकी होती, पूरग्रस्तांना आम्ही धान्य वाटप केले, विजेचे नुकसान सातत्याने आढावा करून घेऊन दूर केले व शेतकऱ्यांना राज्य सरकारने जेव्हा मदतीची घोषणा केली, त्यांनी मात्र उपोषणाची नौटंकी केली, असा आरोप त्यांनी केला.

उपोषण करताना भाजपने विजबिलाच्या सक्तीच्या वसुलीसाठी विजतोडली जात असल्याचा आरोप केला, त्याकडे लक्ष वेधले असता तनपुरे म्हनाले, त्यांनी आधी माहिती करून घ्यावी, नंतर उपोषण करायला हवे होते.

 माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर टीका करताना तनपुरे म्हणाले, मिरी -तीसगाव व बुऱ्हाणनगर पाणी योजनेची वीज दोन वेळा तोडली असताना ती मी पुन्हा जोडून दिली परंतु वस्तुस्थिती सांगण्यासाठी बोलवलेल्या बैठकीस बुरहाणंनगरचे सरपंच येत नाहीत, तसेच बुरहाणंनगर च्या पाणी योजनेतून कोणाच्या शेताला पाणी जातं याची तक्रार झालेली आहेत मागील पंचवीस वर्षात नगर तालुक्यात वीज पुरवठ्याची कोणतीही पायाभूत कामे झाली नाहीत, फक्त बैठकांतून अधिकाऱ्यांना झापले की काम झाले असेच चालले होते. शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी वीज पुरवठ्याचा कोणत्याही पायाभूत सुविधा केलेल्या नाहीत, असा आरोप त्यांनी कर्डिले यांच्यावर केला. नगर-मनमाड रोडवर पावसामुळे खड्डे पडले आहेत, यावरून रोज खासदार विखे जातात, त्यांनी केंद्राकडे जाऊन यासह सगळ्यात महामार्ग साठी पैसे आणायला हवे होते, असेही भाष्य तनपुरे यांनी केले.

 तुमचे बॅलन्स शीट चेक करण्याची गरज

 या आंदोलनात खासदार सुजय विखे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना ते त्यांचे बॅलन्स शीट चेक करीत आहेत, असा आरोप केला होता यावर बोलताना तनपुरे म्हणाले, त्यांच्यापेक्षा तुमचे बॅलन्स शीट चेक करण्याची आता वेळ आली आहे, त्यांचे नेते हर्षवर्धन पाटील म्हणतात भाजपमध्ये गेल्यामुळे शांत झोप लागते, तसे काहीजण शांत झोप येण्यासाठी भाजपमध्ये गेले आहेत, ही झोप झाल्यावर काहींना खुमखुमी येते व ती अशी वक्तव्य करतात, परंतु त्यांनी मुश्रीफ यांच्या वयाचा, ज्येष्ठत्वाचा विचार करून तरी बोलायला हवे होते, असा टोलाही त्यांनी खासदार विखेना लगावला.

COMMENTS