अफगाणिस्तानने भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवून देण्यासाठी जीवापाड प्रयत्न केला. अफगाणिस्तानने पाकिस्तानपुढे १३० धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान
अफगाणिस्तानने भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवून देण्यासाठी जीवापाड प्रयत्न केला. अफगाणिस्तानने पाकिस्तानपुढे १३० धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान माफक वाटत असले तरी त्यांनी अचूक आणि भेदक मारा केला. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी अखेरच्या षटकात ११ धावा हव्या होत्या. पाकिस्तानच्या नसीम शाहने २० व्या षटकाच्या पहिल्या दोन्ही चेंडूवर षटकार खेचले आणि संघाला थरारक विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती, पण भेदक गोलंदाजी करत त्यांनी पाकिस्तानला चांगलेच वेठीस धरले होते. अफगाणिस्तानने पाकिस्तानपुढे विजयासाठी १३० धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून त्यांनी पाकिस्ताना जखडून ठेवायला सुरुवात केली. पहिल्याच षटकात पाकिस्तानला बाबर आझमच्या रुपात मोठा धक्का बसला. बाबरला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यावेळी पाकिस्तानची १ बाद १ धाव अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर पाकिस्तानला एकामागून एक धक्के बसत गेले आणि त्यामुळे पाकिस्तानचा डाव अडचणीत आला. पाकिस्तानने आपला अर्धा संघ ९७ धावांमध्ये बाद झाला. त्यानंतर १३ धावांमध्ये पाकिस्तानने अजून तीन विकेट्स गमावले आणि त्यांची ८ बाद ११० अशी अवस्था झाली होती. त्यामुळे हा सामना आता कोण जिंकणार, याची उत्सुकता वाढली होती. कारण पाकिस्तानला जिंकण्यासाठी यावेळी २० धावांची गरज होती, तर दोन विकेट्स मिळवत अफगाणिस्तानचा संघ विजयी ठरू शकत होता आणि या परिस्थितीवर भारताच्या आशा अवलंबून होत्या. त्यानंतर १९व्या षटकात पाकिस्तानला दुसरा धक्का बसला आणि त्यांची ९ बाद ११८ अशी अवस्था झाली होती

COMMENTS