आर्थिक वर्षात भारत आणणार डिजीटल करन्सी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आर्थिक वर्षात भारत आणणार डिजीटल करन्सी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये डिजीटल करन्सीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षापासून केंद्रीय बँकेच्या माध्यमातून भारत

LokNews24 Prime Time LIVE | एकाचा गळा दाबला, तर दुसऱ्याला भोसकलं ! | loknews24
तोल जाऊन बाईकस्वार अचानक पडला खड्ड्यात
माजी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचे निधन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये डिजीटल करन्सीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षापासून केंद्रीय बँकेच्या माध्यमातून भारत स्वत:ची डिजीटल करन्सी जारी करणार आहे. यासंदर्भातील घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्येच ही करन्सी जारी केली जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आज डिजीटल रुपीची घोषणा केली. हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केले जाणार आहे. डिजीटल रुपीच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आणि अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल असा विश्‍वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलाय. डिजीटल रुपी हे आभासी चलन ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरबीआयकडून 2022-23 दरम्यान जारी केले जाणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले.

COMMENTS