Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहर राष्ट्रवादी कार्यकारणीत नव्यांना संधी : आ. काळे

कोपरगाव : मागील दहा वर्षांपूर्वी कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना करण्यात आलेल्या कार्यकारणी व त्यांच्या सर्व कमिट्या बरखास्त करण्यात आल्या असून नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी मागील दहा वर्षांपूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहर कार्यकारणी व कमिट्यांची स्थापना केली होती.यामध्ये कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सिनिअर) अध्यक्ष व सर्व कमिटी, कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष व सर्व कमिटी,कोपरगाव शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष व सर्व कमिटी, कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष व सर्व कमिटी  आदींसह विविध पदनिर्मिती व नियुक्ती करण्यात आली होती. अशा विविध कमिट्यांवर कोपरगाव शहरातील कार्यकर्त्यांची नेमणूक केली होती.  परंतु नव्या उमेदीच्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी या उद्देशातून व कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिक संघटन वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोपरगाव शहराच्या सर्वच भागातील कार्यशील कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांना कोपरगाव शहराच्या पक्ष कार्यकारिणीवर संधी देण्यात येवून नवीन कार्यकारणी त्यांच्या अध्यक्ष व कमिट्या तयार करण्यात येणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

विकासकामांना आडवे आला तर सोडणार नाही
सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ
साखर उद्योगाबाबत शाश्‍वत धोरणाची गरज ः आ. आशुतोष काळे

कोपरगाव : मागील दहा वर्षांपूर्वी कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना करण्यात आलेल्या कार्यकारणी व त्यांच्या सर्व कमिट्या बरखास्त करण्यात आल्या असून नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी मागील दहा वर्षांपूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहर कार्यकारणी व कमिट्यांची स्थापना केली होती.यामध्ये कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सिनिअर) अध्यक्ष व सर्व कमिटी, कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष व सर्व कमिटी,कोपरगाव शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष व सर्व कमिटी, कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष व सर्व कमिटी  आदींसह विविध पदनिर्मिती व नियुक्ती करण्यात आली होती.

अशा विविध कमिट्यांवर कोपरगाव शहरातील कार्यकर्त्यांची नेमणूक केली होती.  परंतु नव्या उमेदीच्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी या उद्देशातून व कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिक संघटन वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोपरगाव शहराच्या सर्वच भागातील कार्यशील कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांना कोपरगाव शहराच्या पक्ष कार्यकारिणीवर संधी देण्यात येवून नवीन कार्यकारणी त्यांच्या अध्यक्ष व कमिट्या तयार करण्यात येणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

COMMENTS