परभणीला कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून दूर ठेवण्यास प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी आंचल गोयल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणीला कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून दूर ठेवण्यास प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी आंचल गोयल

परभणी,- प्रतिनिधी  मानवत येथील लसीकरणाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा यासाठी नगरपरिषदेच्या नगरसेवकांचे सहकार्य घेवून मानवत शहर येत्य

असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात दाखल; प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत सोहळा
मोबाईल टॉवरची बॅटरी चोरणारे मोठे रॅकेट उघडकीस; सात आरोपी अटकेत; तिघे फरार, शोध सूरू
Parbhani : मॉर्निंग वॉक करणाऱ्या चार नागरिकांना ट्रकने चिरडले…

परभणी,- प्रतिनिधी 

मानवत येथील लसीकरणाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा यासाठी नगरपरिषदेच्या नगरसेवकांचे सहकार्य घेवून मानवत शहर येत्या दहा दिवसात 100 टक्के कोरोना लसीकरण पुर्ण होण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती द्यावी. मानवत शहरातील नागरिकांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जबाबदारीने मास्कचा वापर करावा. तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याला कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेपासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून आरोग्य विभागाने कोरोना चाचण्या  व लसीकरण वाढविण्यावर भर द्यावा.  अशा सुचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केल्या.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मानवत नगर परिषदेच्या सभागृहात तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मानवत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष एस.एम.पाटील, उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे,  मुख्याधिकारी जयवंत सोनवणे,तहसीलदार डी. डी फुपाटे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, निवासी आरोग्य अधिकारी डॉ.किशोर सुरवसे, पोलिस निरीक्षक यांच्यासह नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या की, नगरपरिषदेने एक वॉर्ड समोर ठेवून 100 टक्के लसीकरण पुर्ण करावे. या लसीकरण केंद्रावर मानवत नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी उपस्थित राहून 100 टक्के लसीकरण होईल यादृष्टीने प्रयत्न व सहकार्य करणे प्रशासनास अपेक्षित आहे.  नागरिकांन मध्ये मास्क वापराबाबत जागृकता वाढवावी. नागरिकांनी ही  कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता लसीकरणास प्रतिसाद द्यावा यासाठी विविध मोहिमेचे आयोजन करावे.  तहसिलदारांनी तालुका इन्सीडेंट कमांडर म्हणून लसीकरण वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करावे असे सांगून बाभुळगाव व इरळद येथील पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तातडीने  चाचणी करावी यामध्ये दिरंगाई होता कामा नये अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. संशयीतांची लॅब टेस्ट घेतल्यानंतर 24 तासाच्या आत संबंधितास त्यांचा अहवाल मिळावा यासाठी तातडीने प्रयत्न करावेत.

नगरपरिषद मानवत येथे 9 प्रभाग असून या ठिकाणी  लसीकरणाला गती देण्यासाठी मनुष्यबळ जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून उपलब्ध करुन देण्यात येईल. पोलिस विभागाने मास्क घालण्याबाबत नागरिकांना सक्ती करावी अन्यथा मानवत शहरात 144 कलम लागू केले जाईल. असे सांगून नगरपालिका प्रशासनाला सोबत घेवून मास्क न घालणार्‍यावर दंडात्मक कार्यवाही करावी अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी करत नगरपरिषदेने घंटागाडीच्या माध्यमातून लसीकरण, आरटीपीसीआर चाचणी आणि मास्क वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर द्यावा. मानवत शहरातील आठवडी बाजार बंद, गर्दीची ठिकाणे, शाळा, धार्मिक स्थळे बंद राहतील असेही सांगितले.

बैठकीनंतर मानवत नगर परिषदेकडून राजेराणा चौकातील विकसित करण्यात आलेल्या गुरुवर्य दिव्यानंद उद्यानास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रत्यक्ष भेट देवून उद्यानातील बदक, हरिण, काळविट, ससा यांच्यासह इतर प्राण्यासह फुले, झाडे, वेलीसह रचनेचे केलेले काम अतिशय शिस्तबध्द, सुव्यवस्थित व सुंदर असल्याचे सांगून त्यांनी या कामाप्रती समाधान व्यक्त करत उद्यानाच्या झालेल्या कामाचे कौतुक केले.  

COMMENTS