Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकासकामांना आडवे आला तर सोडणार नाही

आमदार आशुतोष काळेंचा विरोधकांना गर्भित ईशारा

कोपरगाव/प्रतिनिधी ः कोपरगाव शहराच्या विकासासाठी चार वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍न मार्गी लागण्याबरोब

आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद
गोदावरी उजव्या-डाव्या कालव्यांचे काम प्रगतीपथावर – आ. आशुतोष काळे
भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

कोपरगाव/प्रतिनिधी ः कोपरगाव शहराच्या विकासासाठी चार वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍न मार्गी लागण्याबरोबरच कोपरगाव शहराचा झालेला विकास कोपरगाव शहरातील सुज्ञ जनता पाहत आहे अनुभवत आहे. जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करून कोपरगाव शहराची धुळगाव ओळख पुसण्यात यशस्वी झालो आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिक समाधानी आहेत याचे विरोधकांना दु:ख होत असून कोपरगाव शहराचा झालेला विकास विरोधकांना बघवत नाही. त्यामुळे चांगल्या कामात विघ्न आणण्याचे पाप विरोधक करीत असून मुद्दामहून आमच्या वाटेला गेला तर सोडणार नाही असा गर्भीत इशारा आ. आशुतोष काळे यांनी विरोधकांना दिला आहे.
आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन योजनेतून मिळालेल्या 5 कोटी 20 लक्ष रुपये निधीतील विविध विकास कामांचे 77 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कोल्हेंनी देखील संबंध नसतांना या कामाचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना आ. आशुतोष काळे यांनी शहरातील द्वारकानगरी शंकरनगर येथे झालेल्या जाहीर सभेत इशारा दिला आहे. यावेळी शहरातील विविध प्रभागातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आमदार काळे यांनी केले.

यावेळी पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, मतदार संघातील जनतेने दाखविलेल्या विश्‍वासातून तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांसाठी निधी मिळवून देणे हि माझी जबाबदारी आहे. ती जबाबदरी सक्षमपणे पार पाडतांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचे दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी 131.24 कोटी निधी देवून पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. त्याचबरोबर कोपरगाव शहराच्या विकासासाठी यापूर्वी जवळपास 20 कोटी, हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी 10 कोटी व जिल्हा नियोजनमधून 5.20 कोटी निधी आणला आहे. त्यामुळे या विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा मला अधिकार असून प्रशासकीय अधिकार्‍यांनी उपस्थित राहणे त्यांचे कर्तव्य आहे. त्यामध्ये विरोधकांना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. मात्र ज्यांचा काडीचा सबंध नसतांना मागील 35 ते 40 वर्षापासून न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची त्यांची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी केलेला आटापिटा केविलवाणा आहे. त्यांना विकास करता आला नाही व आता होत असलेला विकास त्यांना देखवत नाही. हे कोपरगाव शहरातील सुज्ञ नागरिक पाहत आहे. या चार वर्षात आपण केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचली असून विकास काय असतो हे चार वर्षात कोपरगाव शहराच्या झालेल्या बदलातून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पुन्हा संधी आपल्याला मिळणार असल्यामुळे त्यांचा जळफळाट सुरु आहे हे मी समजू शकतो. परंतु मी मुद्दामहून कुणाच्या वाटेला जात नाही तो माझा स्वभाव नाही. परंतु विनाकारण माझ्या वाटेला कोणी गेला तर सोडणार नाही असे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी कोल्हेंना ठणकावून सांगितले. यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, बांधकाम अभियंता जनार्दन फुलारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध प्रभागातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपनगरांसाठी 10 कोटी पहिला टप्पा – हद्दवाढ झालेल्या भागातील कोपरगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटी पहिला टप्पा आहे. यातून सर्वच विकासाची काही कामे पूर्ण होतील. परंतु सर्वच विकासकामे पूर्ण करायची असून त्यासाठी अधिकचा निधी मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना मिळणार्‍या सोयी सुविधा प्रमाणे हद्दवाढ झालेल्या भागातील नागरिकांना देखील सुविधा मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा आमदार काळे यांनी दिला आहे.

COMMENTS