तिघांवर गुन्हा दाखल, एक सावकार जेरबंद; कर्जत पोलिसांची सावकारांविरुद्धची मोहीम सुरूच

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तिघांवर गुन्हा दाखल, एक सावकार जेरबंद; कर्जत पोलिसांची सावकारांविरुद्धची मोहीम सुरूच

कर्जत/प्रतिनिधी : विना परवाना खासगी सावकारकीचे उच्चाटन करण्यासाठी कर्जत पोलीसांनी हाती घेतलेल्या मोहिमेमुळे अनेक सावकारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अ

बंद केलेले पाणी टँकर पुन्हा चालू करा
पाटबंधारे विभागाकडून उन्हाळी आवर्तन सोडण्याची तयारी सुरू
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या तब्बल 109 विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलिस दलात निवड

कर्जत/प्रतिनिधी : विना परवाना खासगी सावकारकीचे उच्चाटन करण्यासाठी कर्जत पोलीसांनी हाती घेतलेल्या मोहिमेमुळे अनेक सावकारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनेक शेतकरी व गोरगरीब नागरीकांचे फास यामुळे सैल झाले आहेत. अजुनही अनेक खासगी सावकारकीची प्रकरणे समोर येत असुन अशा सावकारांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र पोलिसांनी सुरूच ठेवले आहे.
 तालुक्यातील थेटेवाडी येथील शेतकऱ्याच्या तक्रारीवरून वेगवेगळ्या गावातील तीन सावकारांवर गुन्हा दाखल झाल्याने व एकास अटकही करण्यात आल्याने खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत. हरिदास आण्णासाहेब मांढरे (रा.थेटेवाडी ता. कर्जत) हे शेती व्यवसायाबरोबरच विहिर खोदकामाचा ठेका घेण्याचा व्यवसाय करतात. 
फेब्रुवारी २०१७ साली गुरवपिंप्री शिवारात वंदना साबळे यांच्या विहीरीचे काम सुरू असताना मांढरे यांच्याकडे मजुर म्हणुन काम करणारा नभाजी खामगळ हा मजुर विहिरीतील खरीप भरत असताना विहिरीच्या कडेचा दगड निसटून त्याच्या डोक्यात पडून तो जखमी झाला होता. त्याच्या औषधोपचाराला सुमारे ९ लाख रुपये खर्च झाला मात्र एवढी रक्कम मांढरे यांच्याकडे नसल्याने त्यांनी मिरजगाव येथील आपल्या ओळखीचे चेतन भंडारी व उत्तम भंडारी यांच्याकडून ९ लाख उसने घेतले होते मात्र, ही रक्कम परत देण्यासाठी पैसे नसल्याने मांढरे यांनी आपल्या ओळखीचे खाजगी सावकार राजु श्रीरंग जंजिरे (रा. मिरजगाव) यांच्याकडून एप्रिल २०१७ साली ४ लाख रुपये ४ टक्के व्याजदराने घेतले होते. प्रतिमाहिना व्याजाची १६००० रक्कम सावकाराला देण्यात येत होती.
 भंडारी यांच्याकडून उसनवारी घेतलेली रक्कम पुर्ण होत नसल्याने त्यांची रक्कम देण्यासाठी सन २०१८ साली ओळखीचे खाजगी सावकार रामदास दादासाहेब खेडकर (रा.रवळगाव ता.कर्जत) याच्याकडून ३ लाख रुपये ८ रुपये टक्के व्याजदराने घेतले होते. या रकमेच्या व्याजाची २४००० हजार एवढी रक्कम प्रतिमाहिना दिली. त्यानंतर भंडारी यांचे उसने रक्कम देणे असल्याने जुलै २०१९ साली खाजगी सावकार राजु महादेव काळे (रा.वालवड ता. कर्जत) याच्याकडुन १ लाख रुपये ५ टक्के व्याजदराने घेतले होते.या व्याजाची ५ हजार रक्कम वेळेच्यावेळी मांढरे यांनी सावकाराला दिली.

मात्र त्यानंतर काही दिवसांनी या सावकारांची रक्कम मांढरे यांना वेळेवर देणे जमले नाही. त्यांनी आपल्या गुरवपिंप्री शिवारातील एक एकर जमीन दि.२७ मे २०१९ साली अरुण लाढाणे यांना विकून त्यातून मिळालेली ४ लाख १० हजार रक्कम सावकार राजु श्रीरंग जंजिरे याच्या नागेबाबा पतसंस्थेच्या अकाउंटवर तसेच काही रक्कम रोख स्वरूपात दिली होती.तसेच तक्रारदार मांढरे यांच्या मालकीचे असलेले ट्रॅक्टर अशोक खांडेकर यांना ५ महिन्यांपूर्वी विकून त्यातून आलेली रक्कम सावकार रामदास खेडकर यांना ३ लाख रुपये दिले.सावजार राजु जंजिरे याच्याकडून घेतलेल्या रकमेचे व्याज तक्रारदार मांढरे यांना देता न आल्याने दि.७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता तक्रारदार मांढरे यांच्या घरी येऊन तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ व दमदाटी केली.
तसेच रामदास खेडकर यानेही व्याजाच्या पैशांसाठी २३ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजता  शिवीगाळ व दमदाटी केली.परंतु भितीपोटी तक्रारदार मांढरे यांनी फिर्याद दिली नव्हती.मात्र खाजगी सावकार राजु श्रीरंग जंजिरे रा.मिरजगाव, रामदास दादासाहेब खेडकर रा.रवळगाव,राजु महादेव काळे रा.वालवड सर्व ता. कर्जत यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असुन तीनही सावकारांवर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन यातील एक सावकार राजू जंजिरे यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मराठी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोलीस अंमलदार बबन दहिफळे, वाघ यांनी केली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार बबन दहिफळे हे करत आहेत.

COMMENTS