Homeताज्या बातम्यादेश

भारतात केवळ 16 टक्केच जनता गरीब

41 कोटींहून अधिक नागरिक गरिबीतून बाहेर संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून स्पष्ट

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः स्वातंत्र्यानंतर भारतातील बहुसंख्य जनतेला गरीबीतून बाहेर काढण्याचे महत्वाचे आव्हान सत्ताधार्‍यांसमोर होते. त्यानंतर आलेल्य

पैगंबरांच्या अपमानचा बदला घेण्यासाठीच उमेश कोल्हेंची हत्या
काँग्रेस गळती कशी रोखणार ?
माजलगाव शहर पोलिसांनी केला खुनाचा उलगडा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः स्वातंत्र्यानंतर भारतातील बहुसंख्य जनतेला गरीबीतून बाहेर काढण्याचे महत्वाचे आव्हान सत्ताधार्‍यांसमोर होते. त्यानंतर आलेल्या विविध संकटानंतर हा स्तर खालावतच गेला. मात्र खाऊजाच्या धोरणानंतर देशातील प्रत्येक नागरिकाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी सोयी-सुविधा मिळू लागल्या. त्यानंतर आजमितीस भारतात कवळ 16 टक्केच नागरिक गरीब असून, देशातील 41 कोटींहून अधिक नागरिक गरीबीतून बाहेर आल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये भारतातील 41.5 कोटी दारिद्र्यातून बाहेर आल्याचे या अहवालात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राने नुकताच जागतिक बहुआयामी गरीबी इंडेक्सची आकडेवारी जारी केली असून, या अहवालामध्ये म्हटले आहे की, 2005-06 ते 2019-21 या कालावधीमधील ही आकडेवारी असून, या 15 वर्षांच्या काळात भारतातील गरीबी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. केवळ भारतातच नव्हे तर आणखी 25 देशांनी आपल्या देशातील गरीबी कमी केल्याचे या अहवालात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि ऑक्सफोर्ड गरीबी आणि मानव विकास मोहीम या संस्थांनी ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीमध्ये ही माहिती देण्यात आली. यामध्ये म्हटले आहे की, भारतासह  कंबोडिया, चीन, कांगो, होंडुरास, इंडोनेशिया, मोरक्को, सर्बिया आणि व्हिएतनाम या देशांचा वेगाने विकास होत आहे. यामुळे जगभरातील गरीबी नष्ट करणे शक्य असल्याचे नमूद केले आहे.
भारतामध्ये 2005-06 साली गरीबांची टक्केवारी 55.1 टक्के होती, जी 2019-21 या कालावधीमध्ये केवळ 16.4 टक्के एवढी झाली. 2005-06 साली देशातील बहुआयामी गरीबांची संख्या 64.5 कोटी होती. तर, 2015-16 साली ही संख्या 37 कोटींवर पोहोचली. त्यानंतर 2019-21 या वर्षीपर्यंत ही संख्या केवळ 23 कोटींवर आली आहे. भारतातील पोषण संकेतांकानुसार गरीब आणि वंचित लोकांची टक्केवारी 2005-06 साली 44.3 टक्के होती. ती आता कमी होऊन केवळ 11.8 टक्के झाली आहे.

बालमृत्यू दर साडेचारवरून दीड टक्क्यांवर – भारतामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग प्रचंड असल्यामुळे, आणि आरोग्या यंत्रणांची कमकरता असल्यामुळे बालमृत्यू दर 4.5 टक्के होता, मात्र या अहवालानुसार हा दर आता 1.5 टक्क्यांवर आला आहे. तसेच 2005-06 मध्ये 52.9 टक्के लोकांकडे अन्न शिजवण्यासाठी इंधन उपलब्ध नव्हते. आता ही संख्या 13.9 टक्के आहे. पेयजलाच्या उपलब्धतेबाबत आकडेवारीमध्ये असे दिसून आले, की 2005-06 साली 16.4 टक्के लोकांकडे शुद्ध पेयजल उपलब्ध नव्हते. ही संख्या आता 2.7 टक्के झाली आहे. तर, वीज पुरवठा उपलब्ध नसलेल्या व्यक्तींची आकडेवारी 29 टक्क्यांवरून 2.1 टक्क्यांवर आली आहे. 2005-06 साली 44.9 टक्के नागरिकांकडे घर नव्हते, ही संख्या आता 13.6 टक्के झाली आहे.

COMMENTS