कोरोनाचे नवे 15 रुग्ण आढळल्याने अकोले हादरले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाचे नवे 15 रुग्ण आढळल्याने अकोले हादरले

अकोले/प्रतिनिधी : अकोले तालुक्यात मागील दोन दिवसात कोरोनाचे पंधरा बाधीत रुग्ण आढळल्याने अकोलेकरांचे टेन्शन पुन्हा वाढले आहे. अकोल्यात कोरोना पुन्हा ड

सावेडी उपनगर भागातील श्रीराम चौक ते पुणे बस सेवेचा शुभारंभ
उपअधीक्षक मिटकेंची समर्थ निसर्गोपचार केंद्रास भेट
नगरपालिका शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन

अकोले/प्रतिनिधी : अकोले तालुक्यात मागील दोन दिवसात कोरोनाचे पंधरा बाधीत रुग्ण आढळल्याने अकोलेकरांचे टेन्शन पुन्हा वाढले आहे. अकोल्यात कोरोना पुन्हा डोके वर काढू लागल्याने अकोलेकरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अकोल्यात सक्रिय रुग्णांची संख्या आता 24 झाली आहे. अकोले तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या झिरो झाली होती. यामुळे तालुक्यातील कोविड सेंटर बंद करण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसापासून अकोले तालुक्यात कोविड रुग्ण संख्या हळू वाढत असल्याचे आता दिसू लागले आहे. लग्नसराईची आणि निवडणुकांची धामधूम आता महागात पडते की काय अशी शंका निर्माण होत आहे. रविवारी अकोले तालुक्यात सात बाधित रुग्ण आढळले होते आणि सोमवारी आणखी आठ रुग्ण बाधीत आढळल्याने दोन दिवसात रुग्ण संख्या 15ने वाढली आहे पळसुंदे, शेंडी, समशेरपुर, उंचखडक या ठिकाणी हे रुग्ण आढळून आले पळसुंदे येथील आश्रम शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. अकोले तालुक्यातील कोविड अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 24 झाली आहे. हे सर्व रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहे तर तीन रुग्ण होम क्वारंटाईन असल्याचे प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे आणि मास्कचा वापर करावा, बेसावधपणे वावरू नये, गर्दी करु नये, गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर पाळावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

COMMENTS