मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' काल १ मे पासून सुरू होत झाल्याने राज्यातील या दोन प्रमुख शहरांमधील प्रवास अधिक जलद आणि

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ काल १ मे पासून सुरू होत झाल्याने राज्यातील या दोन प्रमुख शहरांमधील प्रवास अधिक जलद आणि सोपा होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासमोर एक नवीन कार्य येणार आहे. ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामकाजात वाढ झाल्यामुळे वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या वाढत्या वाहनांना सामावून घेण्यासाठी, सध्याच्या द्रुतगती मार्गाचे सहा लेनवरून दहा लेनपर्यंत रुंदीकरण करावे लागेल.मिसिंग लिंक हा खोपोली ते कुसगाव दरम्यानचा १३.३ किमी लांबीचा बायपास आहे. यामुळे लोणावळा-खंडाळा घाट टाळता येतो, जिथे प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे पुणे व मुंबई दरम्यान दररोज दीड लाख वाहनांचा प्रवासाचा वेळ वाढतो . आठ पदरी मिसिंग लिंकमुळे महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे पुणे आणि मुंबई यांच्यातील प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होऊन सहा किलोमीटरचे अंतर कमी होण्याची अपेक्षा आहे
महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाद्वारे दाखवलेली दूरदृष्टी अत्यंत प्रशंसनीय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवे बळ मिळाले.
तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गावर अतिरिक्त टोल न आकारण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सामान्य नागरिकांच्या हिताचा आहे. परिवर्तनकारी मैलाचा दगड” ठरलेल्या, ‘मिसिंग लिंक’मुळे केवळ वाहतूकच सुधारणार नाही, तर उच्च क्षमतेचे नवीन मार्गही खुले होतील. “यामुळे प्रस्थापित शहरी केंद्रांवरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि संपूर्ण एमएमआरमध्ये अधिक संतुलित, भविष्यासाठी सज्ज विकास साधता येईल. या प्रकल्पाची वेळ मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नियोजित नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र यांसारख्या मोठ्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या लाटेशी जुळते, आणि या सर्वांमुळे मागणीचे विकेंद्रीकरण होत आहे.
एकत्रितपणे, हे प्रकल्प मुंबईचा शहरी विस्तार बाह्य परिसरांपर्यंत करत आहेत आणि नवी मुंबई व पनवेलच्या पलीकडे नवीन निवासी व व्यावसायिक समूह निर्माण करत आहेत. मिसिंग लिंक कॉरिडॉरच्या बाजूने रिअल इस्टेटमधील घडामोडी आधीच वेग घेत आहेत, विशेषतः प्लॉटेड डेव्हलपमेंट्स, व्हिला कम्युनिटीज आणि वेलनेस-ओरिएंटेड सेकंड होम्सच्या बाबतीत. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, सुधारलेल्या सुलभतेमुळे खरेदीदार पारंपरिक बाजारपेठांच्या पलीकडे पाहण्यास प्रवृत्त होत आहेत. सरकार, अधिकारी, अभियंते आणि कामगार यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभा राहिलेला हा प्रकल्प खरोखरच कौतुकास्पद आहे. हा मार्ग केवळ दोन शहरांना जोडत नाही, तर तो वेग, सुरक्षितता आणि विकासाला नवी दिशा देतो. घाट परिसरातील जैवविविधता जपण्यासाठी टनेल्स आणि व्हायडक्ट्सचा वापर करण्यात आला, ज्यामुळे जंगलतोड कमी झाली
वन्यप्राण्यांच्या हालचालींवर परिणाम होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना ध्वनी आणि वायुप्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञान यामुळे विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल साधण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येतो. घाट परिसरातील जैवविविधता जपण्यासाठी टनेल्स आणि व्हायडक्ट्सचा वापर करण्यात आला, ज्यामुळे जंगलतोड कमी झाली. वन्यप्राण्यांच्या हालचालींवर परिणाम होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना ध्वनी आणि वायुप्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानयामुळे विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल साधण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येतो.
जे स्वप्न आपण मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांनी बघितलं होतं हे पूर्ण झालंय. सध्या प्रकल्पास ‘मिसिंग लिंक’ म्हटलं जातंय, पण या ला मिसिंग लिंक नाही तर ‘कनेक्टिटिंग लिंक’ नाव द्या, याला नाव जे द्यायचं ते ठरवणार आहोत. पण, अनिलकुमार गायकवाडजी यांनी ‘मिसिंग लिंक’ नाव बदलावं अशी सूचना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.


COMMENTS