Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिराळा न्यायालयाकडून पुन्हा राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट; शिरीष पारकरांना जामीन

शिराळा / प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे वारंट हुकूम होऊन देखील हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने बुधवारी पुन्हा अजामीन पत्र वारंट आदेश जारी केला

लोधवडे येथे शाळा पूर्व तयारी पालक सभा उत्साहात
फसवणूक करून हडपलेली जमीन सरकार जमा: प्रांताधिकारी कट्यारे यांचा ऐतिहासिक निकाल
कराड अर्बन बँकेचा 105 वा वर्धापनदिन उत्साहात

शिराळा / प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे वारंट हुकूम होऊन देखील हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने बुधवारी पुन्हा अजामीन पत्र वारंट आदेश जारी केला आहे. पुढील तारीख 11 जुलै 2022 दिली आहे. मनसे नेते शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन अर्ज दिल्याने त्यांचा अजामीनपात्र वारंट आदेश रद्द केला गेला आहे. मात्र राज ठाकरे हे वारंट हुकूम होऊन देखील न्यायालयात हजर राहिले नाहीत. म्हणून न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश दिला आहे.
शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात नियमित फौजदारी खटला सुनावणी झाली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आरोपी क्रमांक 9 शिरीष पारकर हे आरोपी क्रमांक 10 म्हणून समाविष्ट आहेत. यापूर्वी या दोघांनाही न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटचा आदेश केला होता. त्याप्रमाणे शिरीष पारकर यांनी बुधवारी न्यायालयात हजर राहून जामीन दिला. यावेळी न्यायालयाने त्यांच्या विरुध्द केलेला अजामीनपात्र वॉरंटचा आदेश रद्द केला. न्यायालयाने पारकर यांना 15 हजार रुपयांच्या जामिनावर आणि 700 रुपये खर्चाची दंडाची रक्कम भरून जामीन मंजूर केला.
सन 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर सन 2008 मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसेतर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. म्हणून त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता. यावेळी शिराळा मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. म्हणून तानाजी सावंत आणि इतर काही जणांवर गुन्हे दाखल झाले होते. राज ठाकरे यांना 8 जून 2022 रोजी शिराळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतू राज ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत काही कारणास्तव न्यायालयात हजर राहिले नाहीत. मात्र, शिरीष पारकर न्यायालयात उपस्थित राहिले.
शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल न्यायदंडाधिकार्‍यांनी 28 एप्रिल रोजी अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. त्यामुळे तिघांनाही 8 जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. राज ठाकरे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आणि शिरीष पारकर यांच्यासह दहाजणांवर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे अशा विविध कलमाखाली तसेच 28 जानेवारी, 25 जानेवारी, 11 फेब्रुवारी आणि 28 एप्रिल 2022 या तारखांना गैरहजर राहिल्याबद्दल शिराळा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, या विरोधात इस्लामपूर न्यायालयामध्ये रिव्हिजन दाखल केली आहे. त्याबाबत 9 तारखेला सुनावणी आहे. पण, मनसे नेते शिरीष पारकर यांचा अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष राज ठाकरे यांचा कोणताही सहभाग नसल्याने राज ठाकरे यांचे नाव गुन्ह्यातून काढून टाकावे, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याचे वकील रवी पाटील यांनी सांगितला आहे.

राज ठाकरे हे वारंट हुकूम होऊन देखील न्यायालयात हजर राहिले नाहीत. यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुध्द पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. ए. श्रीराम यांनी दिला आहे.

COMMENTS