Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड अर्बन बँकेचा 105 वा वर्धापनदिन उत्साहात

कराड / प्रतिनिधी : कराड अर्बन बँकेने सामाजिक बांधिलकी जपत अद्यावत सेवा सुविधा देताना नेहमी ग्राहकांचा विश्‍वास संपादित केला असून कराडचे नाव अर्थव

दुकानदारांसह विक्रेत्यांच्या लसीकरणाच्या तपासणीचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
कृष्णा अभिमत विद्यापीठाचा ‘सी-मेट’शी सामंजस्य करार; बायोमेडिकल संशोधनाला मिळणार चालना
महावितरणच्या अथक प्रयत्नांना यश; कृषिपंपांना 8 तास सुरळीत वीजपुरवठा

कराड / प्रतिनिधी : कराड अर्बन बँकेने सामाजिक बांधिलकी जपत अद्यावत सेवा सुविधा देताना नेहमी ग्राहकांचा विश्‍वास संपादित केला असून कराडचे नाव अर्थविश्‍वात अधोरेखित केले असे गौरवोद्गार सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी काढले. ते दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिच्या 105 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
दि. 24 जानेवारी रोजी बँकेचा 105 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त कराड येथील मुख्य कार्यालयाच्या इमारतीमध्ये सकाळी 9 वा. सत्यनारायण पुजा झाली. त्यानंतर मुख्य कार्यालयाच्या इमारतीमधील शताब्दी सभागृहामध्ये संचालक मंडळाशी ना. बाळासाहेब पाटील यांनी संवाद साधून शुभेच्छा दिल्या.
ना. बाळासाहेब पाटील यांच्या बँकेच्या वतीने अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी व बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेच्या सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव आणि संचालक उपस्थित होते.
पश्‍चिम महाराष्ट्रातील नावाजलेल्या व भक्कम अशा कराड अर्बन बँकेच्या अद्यावत सेवा-सुविधा असलेल्या सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राचासातारा जिल्ह्यातील युवकांना तसेच सहकारी वित्तीय संस्थांना नक्की लाभ होणार असून भविष्य काळात बँक सहकार क्षेत्रामध्ये योग्य मार्गदर्शकाची भूमिका पार पाडेल, असा विश्‍वास ना. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
बँकेच्या या वाटचालीत अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव आणि संचालक मंडळाचे योगदान आहे. त्याचप्रमाणे सेवक वर्गाने देखील घेतलेल्या कष्टाचे हे फळ आहे, असे बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासत स्पष्ट केले.
यावेळी कराड शहरातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीपगुरव यांनी केले. सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे प्राचार्य दिलीप देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

COMMENTS