Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजकारणातून संन्यास घेण्याचा कोणताही विचार नाही ः केंद्रीय मंत्री गडकरी

नागपूर/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजकारणातून संन्यास घेण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र राजकारणातून स

गडकरी विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
राज्यपालांच्या हस्ते नितीन गडकरी यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज ः नितीन गडकरी

नागपूर/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजकारणातून संन्यास घेण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र राजकारणातून संन्यास घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच यावेळी त्यांनी माध्यमांनाही सल्ला दिला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरातील कार्यक्रमात एक वक्तव्य केले होते. जेव्हा मते दिली पाहिजेत असे लोकांना वाटेल, तेव्हाच मते द्या, असे विधान केले होते. यावरून नितीन गडकरी हे राजकारणातून संन्यास घेण्याच्या विचारात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता खुद्द नितीन गडकरींनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राजकारणातून संन्यास घेण्याचा माझा कोणताही विचार नाही. माध्यमांनी वृत्तांकन करताना अशा वेळी जबाबदारीने करावे, असा सल्लाही नितीन गडकरी यांनी यावेळी दिला. जर माझे काम आवडत असेल तर, मला मते द्या असे मी म्हणालो होतो. यावरून मी कुठेच राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट होत नाही, असेही गडकरी म्हणाले. नितीन गडकरी म्हणाले होते की, जर माझ्या जागी दुसरं कोणी येत असेल तर मला काहीच अडचण नाही. उलट त्यावेळी मी कामासाठी आणखी वेळ देऊ शकेल. दरम्यान, नितीन गडकरी भाजपमधील दिग्गज नेते आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. रस्ते आणि वाहतूक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामांची नेहमीच चर्चा होत असते. नितीन गडकरी यांना संसद समिती आणि केंद्रीय निवडणूक समितीमध्ये स्थान देण्यात आले नाही. यावरून गडकरी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा पहिल्यांदा सुरू झाली होती. त्यानंतर नागपुरात केलेल्या वक्तव्याने ते राजकारणातून संन्यास घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा होती. मात्र, स्वतः गडकरी यांनी त्यावर स्पष्टीकरण दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

COMMENTS