Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणी पुरठ्यासाठी ग्रामपंचायत अभियंत्याच्या दालना समोर आमरण उपोषण

 नांदेड - जिल्ह्यातील निजामकालीन प्रार्श्वभूमी असलेल्या कंधार तालुक्यातील मौजे पेठवडज तालुका कंधार येथील जल जीवन मिशन अंतर्गत सुधारित अंदाजपत्रक

एक कोटीचा अवैध मद्यसाठा जप्त
तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांची धाडसी कारवाई
फुकट्या प्रवाशांकडून 11 लाखाचा दंड वसूल

 नांदेड – जिल्ह्यातील निजामकालीन प्रार्श्वभूमी असलेल्या कंधार तालुक्यातील मौजे पेठवडज तालुका कंधार येथील जल जीवन मिशन अंतर्गत सुधारित अंदाजपत्रक तयार करुन मिळावे यासाठी चक्क महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर सरपंच प्रतिनिधी व ग्रामस्थासह आमरण उपोषणास प्रारंभ झाले आहे. सविस्तर बातमी अशी की शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमानुसार लोकसंख्या जणगननेनुसार साठवण टाक्यांची क्षमता निश्चित केल्याचे सांगण्यात येते.  पण सन २०२१ ची लोकसंख्येची अद्याप ही जणगणना झाली नसुन,  आकडेवारी हि उपलब्ध नाही आहे. यामुळे सन २०२२ रोजी एप्रिलमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून नोंदवलेली लोकसंख्या वस्तीनिहाय विचारात घेऊन,  त्या प्रभागात ५५ लिटर दरडोई / दरदिवशी शुद्ध पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. वस्ती निहाय एप्रिल २०२२ मध्ये नोंदवण्यात आली होती.  त्यामध्ये  पुनर्वसन वस्ती ,साठे नगर ,गाडगेबाबा नगर ,आनंद नगर ,पेठवडज वस्ती वाढ इंदिरानगर ते ग्रामपंचायत कार्यालय व मुळ पेठवडज गाव वस्ती या भागातील पाणी पुरवठ्याच्या अनूषंगाने ग्रामपंचायत कार्यालय पेठवडजच्या मासिक बैठकीमध्ये मा. उपभियंता जीवन प्राधिकरण यांना निमंत्रित करून त्यांच्या निदर्शनास आणून दिले की सदरील अंदाजपत्रकात गावासाठी चालू असलेल्या प्राधिकरण मागील पाणीपुरवठा योजनेतील विहीर, पाईपलाईन हि सध्या स्थितीतच अपुरी असुन भविष्यात पाणीपुरवठा कामी हा मंजूर निधी अपूरा पडतो.

पेठवडज हे गाव विकसनशील वस्तीचे गाव असुन जुन्या बाजारपेठेचे गाव आहे. दररोज या गावातील सभोतालीन १५ ते २० गावच्या लोकांचा संपर्क असतो. या गावात दोन बँका जिल्हा परिषद हायस्कूल ४ प्राथमिक शाळा खाजगी ४  प्राथमिक शाळा  आणि एक कनिष्ठ महाविद्यालय आहे .  

– महाविद्यालय असुन दररोज  हजारो लोक बाजारपेठेत इतर कामासाठी ये जा करतात. भविष्यात पेठवडज हे गांव नगरपालिका व तालुक्याचे ठिकाण होणार आहे. 

यामुळे विनंती की  पुनर्वसन वस्तीसाठी एक स्वतंत्र उद्देशाने गावातील विहीर पेठवडज प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात घेण्यात यावी.  त्याच बरोबर नव्या योजनेत घेण्यात आलेल्या अस्तित्वातील विहिरीस खोल करणे.  जलाशयातुन आवश्यक तेवढे पाणी उचलण्यासाठी तांत्रिक दृष्टीने कोणती कामे करणे आवश्यक आहेत.  या बाबींचा विचार करून जुनी उदभव विहीर विकसीत करावी. तसेच प्रत्येक वस्तीमध्ये नव्याने पाईप लाईन पूर्णता टाकण्यात यावी या पूर्वी केलेले अंदाज हे चुकीचे असून भविष्यात पाणी टंचाई भासणारी आहे.  तरी वरील वस्तीनिहाय सुधारित अंदाजपत्रक तयार न करून द्यावी,  या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले असून आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 

COMMENTS