मुंबई दि. 28 : सार्वजनिक वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांवरुन समृद्धी महामार्गाच्या बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसल
मुंबई दि. 28 : सार्वजनिक वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांवरुन समृद्धी महामार्गाच्या बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले. अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्याअंतर्गत असेलेले रस्ते दुरुस्त करण्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे, सुरेश वरपुडकर, भास्कर जाधव, रवी राणा, हिरामण खोसकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. मंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. समृद्धी महामार्गाचे काम करीत असताना जिल्हा परिषद अखत्यारितील 12 रस्त्यांचा वापर कंत्राटदाराकडून साहित्य वाहतुकीसाठी करण्यात आला आहे. या 12 रस्त्यापैकी 10 रस्त्यांची दुरुस्ती कंत्राटदाराकडून करण्यात आली आहे. समृध्दी महामार्गाच्या बांधकामासाठी साहित्य वाहतूक करीत असताना जिल्हा परिषद अखत्यारितील वापर केलेल्या रस्त्यांची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी कंत्राटदाराकडून वेळोवेळी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या रस्ता ओलांडणी पुलाचे बांधकाम करण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत ना हरकत देण्यात आली आहे.
COMMENTS