बुलढाणा जिल्ह्यातील 27 कि.मी. लांबीच्या रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलढाणा जिल्ह्यातील 27 कि.मी. लांबीच्या रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील 33 कि.मी. लांबीच्या रस्त्यापैकी 27 कि.मी. लांबीच्या रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ

हरनाझ संधू ठरली ‘मिस युनिव्हर्सची मानकरी; तब्बल 21 वर्षांनंतर भारताने जिंकला 2021 चा ताज
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विधी सेवा जागरुकता शिबीर
मविआत जागावाटपावरून वाढला तणाव

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील 33 कि.मी. लांबीच्या रस्त्यापैकी 27 कि.मी. लांबीच्या रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे बुलढाणा जिल्ह्यातील रस्त्याची दुरुस्तीबाबतचा तारांकित प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य संजय रायमुलकर, हरीभाऊ बागडे, कैलास गोरट्यांल, विक्रमसिंह सावंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाचे काम वेळेवर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. समृध्दी महामार्ग प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी घेण्यात आल्या त्यांना रेडीरेकनरच्या पाचपटीने मोबदला देण्यात आला आहे. बुलढाण्यातील 33 कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी 27 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम आतापर्यंत पूर्ण झाले असून उर्वरित 6 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

COMMENTS