Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेन्बो स्कूलमध्ये खो-खो स्पर्धांना सुरुवात

कोपरगाव ता.प्रतिनिधी - तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची कवाडे खुली करणार्‍या शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित

राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या महिला मेळाव्यात अंधांनी दिला सक्षमतेचा नारा
कोपरगाव तालुक्यातील सावकारी रॅकेट उघड
शिष्यवृत्ती परीक्षा ही एमपीएससी परीक्षेची पूर्वतयारी :- अभय आव्हाड 

कोपरगाव ता.प्रतिनिधी – तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची कवाडे खुली करणार्‍या शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये 3, 4, 5, व 6 डिसेंबर 2022 रोजी सीबीएसईद्वारा आयोजित क्लस्टर खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 45 खो-खो संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. संस्थेच्या इतिहासात अशा प्रकारच्या स्पर्धांचे प्रथमच आयोजन होत असल्याने शाळेच्या दृष्टीने नक्कीच हा एका सुवर्णपर्वाचा आरंभ असेल असे वक्तव्य प्राचार्य सुरेश शिंदे यांनी केले.
3 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव यांच्या हस्ते या खो-खो स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. सदर प्रसंगी विश्‍वभारती रुरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष – कांतीलाल आग्रवाल, उपाध्यक्ष वनिताताई नागरे, सचिव संजय नागरे, विश्‍वस्त मनोज आग्रवाल, आनंद दगडे यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. खो-खो हा पारंपारिक खेळ असून आपल्या भावना या खेळाशी जोडल्या गेल्या आहेत म्हणूनच पंचक्रोशीतील नागरीकांनी या वेळी प्रचंड संख्येने उपस्थित राहून  खेळाचा आनंद घ्यावा व खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे अवाहन कार्यकारी संचालक आकाश नागरे यांनी केले व सहभागी स्पर्धक संघाना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS