सीईओ पदाचे नाव बदलून डेव्हलपमेंट कमिशनर करण्याची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीईओ पदाचे नाव बदलून डेव्हलपमेंट कमिशनर करण्याची मागणी

पुणे : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या पदाचे नाव बदलून विकास आयुक्त (डेव्हलपमेंट कमिशनर) असे करा. या विकास आयुक्त

अमोल मिटकरी यांचा डॉ. रणजित पाटील यांना टोला
पार्थराज घाटगे हा तरुण परभणीतून बेपत्ता; कुटूंबियांसह पोलिसांचा शोध सुरु
गेवराई बाजार समितीच्या सभापती पदी मुजीब पठाण तर उपसभापती पदी विकास सानप यांची निवड

पुणे : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या पदाचे नाव बदलून विकास आयुक्त (डेव्हलपमेंट कमिशनर) असे करा. या विकास आयुक्तांना महापालिका आयुक्तांच्या धर्तीवर सर्व अधिकार द्या आणि जिल्हा परिषदांना एकच्याऐवजी दोन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नेमा, अशी मागणी करणारा प्रस्ताव पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सचिव राजेशकुमार यांना पाठविला आहे. जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हास्तरावर धोरणात्मक निर्णयांमध्ये सहभागी होता यावे आणि त्यांचा वेळ कार्यालयीन प्रक्रियेमध्ये न जाता, निर्णय प्रक्रियेत उपयोगात यावा, या हेतूने या पदाचे नाव बदलणे आवश्यक आहे. तसेच महापालिका आयुक्तांच्या धर्तीवर ग्रामीण भागाबाबतचे अधिकार प्रदान करण्यात यावेत. शिवाय सध्या विभागीय आयुक्तांकडे असलेले आस्थापनाविषयक बाबी व अपिलीय अधिकारसुद्धा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे द्यावेत.

COMMENTS