जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार

सातारा/प्रतिनिधी : राज्यातील 12 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांसाठी काल सहकार निवडणूक प्राधिकरणाची बैठक झाली. यामध्ये निवडणुकीस पात्र जिल

छत्र बोरगाव शाळेची प्रवेश दिंडी निघाली उत्साहात
कोपरगावमध्ये बालिका दिनानिमित्त कपड्यांचे वाटप
Anil Parab : एस टी कर्मचाऱ्यांनो आत्मदहन करू नका | LokNews24

सातारा/प्रतिनिधी : राज्यातील 12 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांसाठी काल सहकार निवडणूक प्राधिकरणाची बैठक झाली. यामध्ये निवडणुकीस पात्र जिल्हा बँकांच्या प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम सुरू करण्याची सूचना सहकार विभागाला देण्यात आली. त्यामुळे सप्टेंबरमध्ये मतदार यादीचा कार्यक्रम पूर्ण करून ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
कोरोनामुळे जिल्हा बँकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. गेल्या दीड वर्षात जिल्हा बँकांच्या संचालकांना 15 महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. पण आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सहकार विभागाने निवडणूक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणाची बैठक झाली. बैठकीत ज्या टप्प्यांवर निवडणूक थांबली होती. तेथून पुढे कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय झाला. राज्यातील 12 जिल्हा बँका या निवडणुकीसाठी पात्र आहेत. त्यांची प्रारूप यादी तयार करण्याची प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात होणार आहे. यामध्ये ठरावांची प्रक्रिया पूर्ण झालेल्यांची यादी तपासणीसाठी जिल्हा बँकांकडे पाठविली जाणार आहे. यामध्ये कच्ची यादी तयार करून प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यावर हरकती व सुनावणीसाठी 10 दिवसांचा कालावधी आहे. त्यानंतर ही यादी सह निबंधक कार्यालयास पाठविली जाणार आहे. तेथून यादी तपासल्यानंतर प्रारूप यादी तयार करून ती प्रसिध्द केली जाईल. यादीवर हरकती, सुनावणीसाठी दहा दिवसांचा कालावधी आहे. त्यानंतर अंतिम यादी प्रसिध्दीनंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्याच्या सूचना सहकार निवडणूक प्राधीकरणाकडून जिल्हा उपनिबंधकांना मिळेल. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम होवू शकतो. सप्टेंबरमध्ये प्रारूपाचा कार्यक्रम होणार आहे. एका वेळेस सर्व जिल्हा बँकांचे कार्यक्रम घेण्याची तयारी प्राधिकरणाने केली आहे.

COMMENTS