आमच्यासोबत आले म्हणून बरं झालं… नाहीतर काँग्रेसची अवस्था आणखी वाईट झाली असती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमच्यासोबत आले म्हणून बरं झालं… नाहीतर काँग्रेसची अवस्था आणखी वाईट झाली असती

प्रतिनिधी : औरंगाबादशरद पवार यांनी काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीबाबत जे वर्णन केले आहे, ते अगदी योग्य आहे. काँग्रेस जर आमच्या सरकारमध्ये सहभागी झाली

राज्यात उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून संचारबंदी : मुख्यमंत्री ; “या” अत्यावश्यक सेवा राहणार सुरु
*लोकन्यूज 24च्या बातमीने प्रशासनाला आली जाग l पहा LokNews24*
“ठाकरे साहेब भाजपचा अजेंडा राबवतात”

प्रतिनिधी : औरंगाबाद
शरद पवार यांनी काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीबाबत जे वर्णन केले आहे, ते अगदी योग्य आहे. काँग्रेस जर आमच्या सरकारमध्ये सहभागी झाली नसती तर त्यांची आणखी वाईट अवस्था झाली असती.

भविष्यातही काँग्रेसने शिवसेनेला साथ दिली तर त्यांना राज्यात नक्कीच अच्छे दिन येईल, अशा शब्दात शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला सल्ला दिला.

जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केले. पवार साहेबांनी सांगितली अगदी तीच अवस्था काँग्रेसची आहे.

ते आमच्या सरकारमध्ये सामील झाले नसते तर काँग्रेसची अवस्था अधिकच बिकट झाली असती. भविष्यात काँग्रेसला राज्यात मजबुतीने पाय रोवायचे असतील तर त्यांनी शिवसेनेसोबत राहावे.

त्यामुळे निश्चितच काँग्रेसची ताकद राज्यात वाढेल. शिवसेना हा राज्यातील सरकारमधला महत्त्वाचा पक्ष आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर शिवसेना मेन फ्युज आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे बाजूचे फ्युज आहेत.

त्यामुळे मेन फ्युजला धक्का लागणार नाही याची खबरदारी दोन्ही पक्षांना घ्यावी लागेल. मेन फ्युजला थोडाही धक्का लागला तर सगळंच आपोआप बंद पडेल, असा टोलादेखील सत्तार यांनी यावेळी आघाडी सरकारमधील दोन्ही पक्षांना लगावला.

COMMENTS