Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘मोटेगावकर’चा नवा व्हिडिओ व्हायरल; विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडत ‘एम्स’ला लागणारची हमी!

लातूर : वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (NEET) कथित प्रश्नपत्रिका गैरप्रकारामुळे देशभर चर्चेत आलेल्या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी राजधानीत आमरण उपोषण; सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात
जंतर मंतरवर तरुणांचे आंदोलन तीव्र; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कॉकरोच जनता पार्टी ठाम, सरकारच्या चर्चेच्या आवाहनाला नकार
नीट घोटाळा आणि नांदेड पोलीस भरती प्रकरणाच्या चौकशीसाठी युवक काँग्रेसचा धडक मशाल मोर्चा
NEET Exam Shivraj Motegaonkar: शिवराज मोटेगावकरांची भोंदूगिरी, बेंचवर चढून  विद्यार्थ्यांवर पवित्र पाणी शिंपडतानाचा व्हिडीओ व्हायरल | Shivraj  Motegaonkar NEET Exam ...

लातूर : वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (NEET) कथित प्रश्नपत्रिका गैरप्रकारामुळे देशभर चर्चेत आलेल्या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांचा विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडतानाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, त्यावरून शैक्षणिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकानेच विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार केल्याचा आरोप विविध स्तरांतून केला जात आहे.

राजस्थानपासून सुरू झालेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा गैरप्रकाराचे धागेदोरे महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर तपास यंत्रणांनी कारवाई करत मोटेगावकर यांना ताब्यात घेतले होते. ते एका खाजगी मार्गदर्शन संस्थेशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली होती. दरम्यान, आता समोर आलेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

व्हिडिओमध्ये मोटेगावकर वर्गातील बाकावर उभे राहून विद्यार्थ्यांच्या अंगावर आंब्याच्या पानाच्या साहाय्याने पाणी शिंपडताना दिसत आहेत. या वेळी ते विद्यार्थ्यांना “तुम्ही थेट सर्वोच्च वैद्यकीय संस्थेत (AIIMS) प्रवेश मिळवणार”, अशा प्रकारचे उद्गार काढताना ऐकू येत आहेत. हा प्रकार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, शिक्षण क्षेत्रातील जबाबदारीच्या भूमिकेत असलेल्या व्यक्तीकडून अशी कृती होणे चिंताजनक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

COMMENTS