Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यातील सावकारी रॅकेट उघड

तालुका पोलिसांनी तिघांना केली अटक

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील शुक्लेश्‍वर भुजाडे यांनी व्याजाने घेतलेली रक्कम परत करुन देखील अजून पैशाची मागणी करत पैसे न दिल्या

तरूणाच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार
एलआयसीच्या एमडीआरटी पुरस्काराने कल्पना लवांडे सन्मानित
आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश कोपरगावला उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य विभागाची मंजुरी

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील शुक्लेश्‍वर भुजाडे यांनी व्याजाने घेतलेली रक्कम परत करुन देखील अजून पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास त्यांच्या नावावरील जमीन बळजबरीने आरोपींच्या नावावर करून घेण्यासाठी फिर्यादीचे अपहरण करून डांबून ठेवण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. तालुका पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केलेआहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आपेगाव येथील रहिवाशी शुक्लेश्‍वर उत्तम भुजाडे यांनी कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये बुधवार 27 डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सोमवार दि 11 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजे दरम्यान शिरसगाव व कोपरगाव हददीतील शिवारात आरोपी नामे शरद आनंदराव गायकवाड, त्यांचा भाऊ दत्तु आनंदराव गायकवाड, सुनील भुजबळ, नारायण जाधव व खंडु शरद गायकवाड व आणखी तीन अनोळखी इसम यांनी मी व्याजाने घेतलेली रक्कम परत करुन देखील अजून पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास त्यांचे नावावरील जमीन बळजबरीने यातील आरोपीचे नावावर करण्यासाठी संगनमत करुन फिर्यादीस त्यांचे निळ्या रंगाची इर्टीगा गाडीत किडनॅप करुन मारहाण करुन यातील प्रमुख आरोपी  हर्षल दत्तात्रय गवारे यांचे सांगणे वरुन डांबुन ठेवले असल्याच्या फिर्यादी याने दिलेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 594/2023 भादवी कलम 365,327, 346,347,348,506,34 सह महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 39,45,46 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन कोपरगाव तालुका पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवत तात्काळ सदर गुन्हयातील आरोपी शरद आनंदराव गायकवाड, प्रतिक उर्फ खंडु शरद गायकवाड रा शिरसगाव ता कोपरगाव यांना गुरुवार 28 डिसेंबर  रोजी रात्री मोठ्या शिताफीने अटक केली असता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिल्याने व सदर गुन्हयातील अनोळखी दोन आरोपी शैलेश राजेद वाघ व चेतन प्रभाकर मोरे यांची नावे सांगुन सदर गुन्हयात वापरलेली इर्टीगा गाडी हि चेतन प्रभाकर मोरे याची असलेबाबत सांगीतल्याने पोलिसांनी सदर आरोपी याचा शोध घेवुन सदर आरोपी चेतन प्रभाकर मोरे हा पळुन जाण्याचे तयारीत असतांना त्याचे ताब्यातील सुमारे 10 लाख रुपये किमतीची इर्टीगा गाडी एम एच 06 बी ई 6895 सह अटक करण्यात पोलिस यशस्वी झाले आहे. तसेच सदर गुन्हयात वापरण्यात आलेल्या प्रत्येकी 50 हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली एम 17 ए एल  6828 व एम एच 17 ए 2429 असा एकूण 11 लाख रुपयेचा मुद्देमाल  जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच  सदर गुन्हयात कोपरगाव पोलिसांना सावकारी संदर्भातील पुरावे देखील हस्तगत करण्यात यश आले असून सदर गुन्हयातील हर्षल दत्तात्रय गवारे, दत्तु आनंदराव गायकवाड, सुनिल भुजबळ, नारायण जाधव व इतर एक अनोळखी आरोपी यांचा शोध घेवुन त्यांना अटक करण्याची कारवाई पोलीस करीत आहोत. सदरची कौतुकास्पद कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक  राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधीकारी संदिप मिटके यांचा मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोहेकों लांडे, पोकों वाघ, पोकों कोतकर, पोकॉ घनवट, पोकों राजु शेख, पोकों सानप, पोकों आरवडे यांचे पथकाने केलेली आहे.

COMMENTS