मिताली राजच्या  आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

Homeताज्या बातम्यादेश

मिताली राजच्या आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

लंडन : भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज (३८) आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा डोंगर रचनारी खेळाडू ठरली आहे. तिने ३१७ आंतरराष्ट्रीय

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणित विजय
क्रिकेटपटू युवराज सिंग दुसऱ्यांदा बाबा झाला
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा सुरू होण्याआधी फिंचने घेतली निवृत्ती

लंडन : भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज (३८) आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा डोंगर रचनारी खेळाडू ठरली आहे. तिने ३१७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १० हजार ३३७ धावा करत इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्स हिचे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचे रेकॉर्ड तोडले. एडवर्ड्सने १० हजार २७३ धाव केल्या आहेतभारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार मितालीने नाबाद ७५ धावा करून भारताला विजय मिळवून दिला.

या खेळीसोबत ती आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. या सामन्यात १४ धावा करताच तिने शार्लोट एडवर्ड्सचा रेकॉर्ड मोडला. मितालीने हा धावांचा रेकॉर्ड क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून केला आहे. मितालीने कसोटी क्रिकेमध्ये ६६९, टी-२० मध्ये २ हजार ३६४ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७ हजार २४४ धावा केल्या आहेत. मिताली आणि एडवर्ड्सनंतर सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड न्यूझीलंडच्या सूजी बेट्सच्या नावावर असून तिने ७ हजार ८४९ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रेकॉर्ड म्हटले की भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचे नाव सर्वात आधी येते. सचिन २०१२ मध्ये निवृत्त झाला असला तरी आजही अनेक रेकॉर्ड सचिनच्याच नावावर आहेत. त्यातील एक म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा ३४ हजार ३५७. आता मिताली राजने सर्वाधिक धावा करत महिला क्रिकेटमध्येही भारतीयांचा दबदबा निर्माण केला आहे. पुरुष क्रिकेटमध्ये सचिन तर महिला क्रिकेटमध्ये मिताली अशा दोघा भारतीयांनी रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. उल्लेखनीय म्हणजे सचिन आणि मिताली हे दोघेही १६ वर्षे २०५ दिवस वय असताना पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळले.

COMMENTS