Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार पात्र-अपात्रतेचे सुनावणी दोन आठवड्यानंतर

दोन्ही गट एकमेकांना सोपवणार याचिकेची कागदपत्रे

मुंबई/प्रतिनिधी ः शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या पात्र-अपात्रेसंदर्भात गुरूवारी विधिमंडळामध्ये गुरूवारपासून सुनावणी सुरू झाली असली तरी, दोन्

ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीची तलवार नाचवत दहशत | LOKNews24
’टेरर फंडिंग’चा धोका दहशतवादाहून मोठा – गृहमंत्री शहा
महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड

मुंबई/प्रतिनिधी ः शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या पात्र-अपात्रेसंदर्भात गुरूवारी विधिमंडळामध्ये गुरूवारपासून सुनावणी सुरू झाली असली तरी, दोन्ही गटांनी एकमेकांना याचिकेशी संबंधित कागदपत्र सोपवण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आल्याची माहिती शिंदे गटाचे वकील अनिल सिंह यांनी माध्यमांना दिली आहे. त्यामुळे यासंदर्भातील सुनावणी आता दोन आठवड्यानंतर होणार आहे.
ठाकरे गट आणि शिंदे गट आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेत आहेत. दरम्यान एका आठवड्यात आपले म्हणणे सादर करा, असे आदेश  विधानसभा अध्यक्षांनी शिंदे आणि ठाकरे गटाला दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणी आता दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. याप्रकरणी सुनिल प्रभु यांनी याचिका दाखल केली आहे. ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. सुरुवातीला देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. विधानसभा अध्यक्षांनी सुरुवातीला देवदत्त कामत यांच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू ऐकून घेतली.
पहिला युक्तिवाद हा सुनिल प्रभू यांनी दाखल केलेल्या व्हिप नेमका कोणाचा यावर झाला. दोन्ही गटाने युक्तिवाद केला. ठाकरे गटाकडून देवदत्त नागे तर एकनाथ शिंदे यांच्याकडून अनिल सिंह साखरे यांनी युक्तिवाद केला. अनिल सिंह साखरे यांनी आम्हांला कागदपत्रे मिळाली नाहीत असा युक्तिवाद केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाला आप आपले कागदपत्रे एका आठवड्यात एकमेकांना सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर पुढील सुनावणी या प्रकरणी दोन आठवड्यात सुनावणी होईल. यावेळी अधिक माहिती देतांना वकील अनिल सिंह म्हणाले की, गुरुवारी सुनावणीची पहिली तारीख होती. सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या पहिल्या याचिकेवर सुनावणी चालू झाली. व्हीप न पाळल्यामुळे अपात्रतेची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. आमच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला की सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकेच्या प्रती आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात. प्रभूंनी याचिका केली होती की, सगळ्या प्रकरणांची सुनावणी एकत्र घेतली जावी. अध्यक्षांनी दोन्ही पक्षांना आदेश दिले आहेत की, त्यांनी त्यांचे कागदपत्र एकमेकांना द्यावेत. यानंतर पुढची तारीख दिली जाईल. तेव्हा ठरेल की नेमकी सुनावणी कशा पद्धतीने होईल. कागदपत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे, असे अनिल सिंग यांनी यावेळी सांगितले.

दोन आठवड्यानंतर होणार नियमित सुनावणी – आमदारांच्या पात्र-अपात्रतेसंदर्भात गुरूवारी पहिली सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाने आम्हाला याचिकेची कागदपत्र मिळावे, अशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्षांना केली. ती मान्य झाली आहे. आता पुढची तारीख मिळणार आहे. त्यानंतर म्हणजेच दोन आठवड्यानंतर यासंदर्भातील सुनावणी नियमित होणार आहे. गुरूवारी फक्त एकाच याचिकेवर सुनावणी झाली. एकनाथ शिंदे यांच्या एकाच याचिकेवर सुनावणी झाली. शिंदे हेच प्रतिवादी होते, अशी माहितीही शिंदे गटाचे वकील अनिल सिंग यांनी दिली आहे.

COMMENTS