Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाव्य आपत्तीचे योग्य नियोजन करा – आ. आशुतोष काळे

आपत्ती व्यवस्थापन बैठकीत सर्व विभागांना सूचना

कोपरगाव प्रतिनिधी : पावसाळ्यात कुठेही पाणी साचून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेवून आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी

भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
विकासकामांना आडवे आला तर सोडणार नाही
आमदार काळेंची कोपरगावची बाजारपेठ फुलण्यास मदत : सुनील बोरा

कोपरगाव प्रतिनिधी : पावसाळ्यात कुठेही पाणी साचून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेवून आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास अडचणीच्या वेळी नागरिकांना तातडीने मदत मिळाली पाहिजे त्यासाठी सर्व विभागांनी संभाव्य आपत्तीचे योग्य नियोजन करावे. आलेली आपत्ती नागरिकांवर आली नसून ती आपत्ती आपल्यावर आली आहे असे समजून काम करा अशा सूचना देत आ. आशुतोष काळे यांनी देवून अधिकार्‍यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
कोपरगाव शहर व तालुक्यात पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण होणार्‍या संभाव्य अडचणी दूर करण्यासाठी करावयाच्या उपयायोजना बाबत आ. आशुतोष काळे यांनी महसूल, कोपरगाव नगरपरिषद, पंचायत समिती, शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन, कृषी अधिकारी,उर्जा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य, पशु वैद्यकीय, अग्निशमन, पाटबंधारे, जल निस्सारण आदी विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत तहसील कार्यालयात बैठक घेतली. आपत्तीच्या काळात योग्य नियोजन करण्याची जबाबदारी अधिकार्‍यांची असून योग्य नियोजन न झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित करून अधिकार्‍यांची चांगलीच कान उघाडणी करून त्यांना सूचना केल्या. मागील वर्षी निर्माण झालेल्या अडचणी यावर्षी पुन्हा निर्माण होणार नाही याची जलनिस्सारण विभागाने खबरदारी घेवून पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक ओढे-नाल्यांची साफ सफाई समितीने पावसाळ्याच्या आत तातडीने पूर्ण करून घ्यावी. याबाबत जलनिस्सारण विभागाने पूर्ण झालेली कामे व प्रलंबित असलेल्या कामांचा आढावा घेवून प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील सुरेगाव, मंजूर, कोळगाव थडी, पोहेगाव, सोनेवाडी,हरीसन ब्रँच, डाऊच, टाकळी-ब्राम्हणगाव, दहेगाव, खिर्डी गणेश, सी.व्ही. 29 व कॅटल ब्रीडिंग चर योजनाचे काम पूर्ण करा. ग्रामीण भागातील शहापूर वशापांढरी शिंदे वस्ती पर्यंत येणार्‍या पाण्याचे सांडव्याचे नियोजन, खडकी नाला पूल, संवत्सर दशरथवाडी वाघी नाला पूल, मायगाव देवी चौफुली साईड गटार, बक्तरपूर बंधारा गेट, संवत्सर मनाई पूल, धारणगाव येथील नानासाहेब दवंगे यांच्या शेतात साचणारे पाणी, जेऊर पाटोदा येथील आनंद नगर येथे पावसाळ्यात कायम साचणारे पाणी आदी समस्या सोडवा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या.
या बैठकीसाठी प्रभारी तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधीकारी सचिन सूर्यवंशी, भूमी अभिलेखचे एस.जे. भास्कर, जि. प. उपअभियंता सी.डी. लाटे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी एस.आर. वाघ, पी.एस. खेमनर, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, गोदावरी डावा तट कालवा उपविभागीय अभियंता बी.जी. शिंदे, पंचायत समिती कृषी अधिकारी एस.डी. कोष्टी, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.एम. यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, आगार व्यवस्थापक अमोल बनकर, ग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, रेल्वे विभागाचे किरण सोलेट, विशाल सोमवणे, बी.बी. वाघमोडे, महावितरण अभियंता पी.बी. बोंडखळ, सहाय्यक अभियंता वाय.एम. शेलार, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता डी.बी. लाटे, उपअभियंता व्ही.बी. शिंदे, टी.के. थोरात, ए.ए.भालेराव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, कारभारी आगवण, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, शंकरराव चव्हाण, सुनील औताडे, संतोष वर्पे, बाळासाहेब औताडे, मीननाथ गुडघे, किशोर शिंदे, संतोष गुडघे, रविंद्र चोपडे, किशोर जावळे, बाबासाहेब रहाणे आदी उपस्थित होते.

COMMENTS