दिल्लीत बांधकामाधीन भिंत कोसळून 5 मजुरांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीत बांधकामाधीन भिंत कोसळून 5 मजुरांचा मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील अलीपूर परिसरात शुक्रवारी बांधकामाधीन गोदामाची भिंत कोसळून 5 मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. तर 14 जण जखमी

लोकप्रतिनिधी : निलंबन, नियुक्ती आणि संवैधानिक अर्थ!
महाविकास आघाडीचा जागावाटपांचा खेळ
माजलगाव नगरपालिका 10 दिवसांपासून बंद

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील अलीपूर परिसरात शुक्रवारी बांधकामाधीन गोदामाची भिंत कोसळून 5 मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. तर 14 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अजूनही काही मजूर ढिगार्‍याखाली अडकले आहेत.
अपघात झाला त्यावेळी गोदामात 20 ते 25 मजूर काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 5 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तसेच, अपघातातील 14 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 7 जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातावेळी अनेक मजूर तिथे काम करत होते, त्यामुळे ढिगार्‍याखाली अनेक लोक दबल्ची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. अजुन अनेक लोक आपली भीती व्यक्त करण्यासाठी उतरले आहेत. पोलीस प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना राजा हरिश्‍चंद्र रुग्णालयात उपचारासाठी आले आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तेथे पोहोचून बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफ गाझियाबाद, द्वारका दिल्लीच्या प्रादेशिक प्रतिसाद केंद्राचे एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. ढिगार्‍याखालून 14 मजुरांना जिवंत बाहेर काढण्यात आले. दरम्यान, घटना कशी घडली याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुर्घनेत झालेल्या मृत्यूंबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच ते मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अलीपूरमध्ये एक दुःखद दुर्घटना घडली. जिल्हा प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. मी स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्‍वर चरणी प्रार्थना, असे ट्विट मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केले आहे.

COMMENTS