Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वराज्य पक्षाच्या पहिल्या वर्धापन दिनी हजारो सैनिक मुंबईत होणार दाखल – करण गायकर  

नाशिक प्रतिनिधी - मुंबई येथे होणाऱ्या स्वराज्य पक्षाच्या पहिल्या वर्धापन दिन नियोजना संदर्भात आज नाशिक जिल्हा आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झ

जानापुरी नजीक राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात पिंपरणवाडी येथील युवक ठार
सर्वांच्या कवट्या सारख्याच आहेत हो…जातीयवाद कशाला?
मुलांना चांगले आणि विविध क्षेत्रातील शिक्षण देणे गरजेचे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

नाशिक प्रतिनिधी – मुंबई येथे होणाऱ्या स्वराज्य पक्षाच्या पहिल्या वर्धापन दिन नियोजना संदर्भात आज नाशिक जिल्हा आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सदर आढावा बैठकीत स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख करण गायकर,उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी,उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे,उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख मनोरमा पाटील तसेच राज्य कार्यकारणी सदस्य विजय वाहुळे,नवनाथ शिंदे,ज्ञानेश्वर थोरात,पुष्पाताई जगताप,नाशिक जिल्हा प्रमुख आशीष हिरे,पुर्व विभाग जिल्हा प्रमुख प्रा.उमेश शिंदे,जिल्हा संपर्कप्रमुख गुंडाप्पा देवकर,कायदेशीर आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रमुख ॲड नवनाथ कांडेकर,आयटी प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले,शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख विजय खर्जुल,युवक जिल्हाप्रमुख नितीन दातीर,व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख नारायण जाधव,उपजिल्हाप्रमुख डॉ.महेंद्र शिरसाट कामगार आघाडी जिल्हाप्रमुख दिनेश नरवडे,ज्ञानेश्वर कोतकर,जिल्हा कार्याध्यक्ष नवनाथ वैराळ,युवक महानगरप्रमुख पुंडलिक बोडके, विद्यार्थी आघाडी महानगरप्रमुख सागर पवार,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुलक्षणाताई भोसले, महिला आघाडी महानगरप्रमुख निशिगंधा ताई पवार,वाहतूक आघाडी जिल्हाप्रमुख उत्तम कापसे,आयटी उत्तर महाराष्ट्र प्रमुख किरण बोरसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वराज्य पक्षाचा पहिला वर्धापन दिन मुंबई येथे रविवार दिनांक २७ ऑगष्ट रोजी सकाळी अकरा वाजता यशवंतराव चव्हाण हॉल मुंबई मंत्रालयाजवळ आयोजित करण्यात आला असून. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने स्वराज्यचे शिलेदार त्या ठिकाणी उपस्थित राहणार असून संपूर्ण मुंबईमध्ये स्वराज्य चे भगव वादळ धडकणार असल्याचा संकल्प सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

या बैठकीचे प्रास्ताविक प्रा.उमेश शिंदे यांनी केले तर नाशिक जिल्हातील विविध आघाडीचे जिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख,महानगरप्रमुख,जिल्हा पदाधिकारी,उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी,राज्य कार्यकारणी सदस्य यांनी बोलतांना या कार्यक्रम नियोजना संदर्भात काही महत्वपूर्ण सूचना मांडल्या.सर्व पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या भागातून शेकडो स्वराजाच्या शिलेदार मुंबईला घेऊन सोबत घेवून येण्याचे आश्वासीत केले.

या बैठकीच्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रदेश संपर्कप्रमुख करण गायकर यांनी बोलतांना सांगितले की शेती सहकार कामगार शिक्षण आरोग्य या पंचसूत्री प्रमाणे आपण वर्षभरात जे काही काम केले आहे त्या कामाचा लेखाजोखा या वर्धापन दिनाला होणार असून या नियोजित संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली,कार्यक्रमासाठी नाशिकहून मुंबईकडे हजारोंच्या संख्येने एकत्रितपणे रेल्वेने प्रवास करणार असल्याचे या वेळी त्यांनी ठरविले.या रेल्वे प्रवासाचे मुख्य कारण म्हणजे सर्वसामान्य नोकरदार वर्ग तसेच अनेक बांधव हे काही ना काही करण्यासाठी रोज मुंबईला येजा करत असतात आणि या सर्वांचे जाण्याचे हक्काचे स्थान म्हणजे पंचवटी एक्सप्रेस आहे त्यामुळे या रेल्वे प्रवसातून आपल्याला अनेक नाशिककर भेटतील व त्यांच्या असणाऱ्या दैनंदिन समस्या देखील आपल्याला जाणता येतील  व त्यावर आपल्याला सखोलपणे तोडगा काढण्यासाठी हा प्रवास लाभदायक ठरणार आहे असल्याचे मत व्यक्त केले

त्याचप्रमाणे आढावा बैठकीसाठी  उपस्थित पदाधिकारी यांचे आभार मानत जिल्ह्यामध्ये स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून अनेक तालुक्यामध्ये जे चांगले काम चालू आहे त्या सर्व कामाचं कौतुक केले तसेच स्वराज्य महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने ठिकठिकाणी मोफत स्वयंरोजगार शिबिरांचा आयोजन करण्यात येत असल्याने त्यातील काही महिला भगिनींनी रोजगार मिळाला आहे.

अनेक भगिनींनी राखी बनविण्याचे प्रशिक्षण घेतले असून सर्व पदाधिकाऱ्यांना रक्षाबंधन साठी या राख्या घेऊन जाण्याचा संकल्पही करण्यास सांगितला.

त्याच बरोबर तालुक्यातून येणाऱ्या सर्व पदाधिकारी यांनी सोबत येणाऱ्या प्रत्येक बांधवांची यादी बनवून सर्वांनी प्रवासाचे काटेकोर नियोजन योग्य वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.या बैठकीला युवक जिल्हा संपर्कप्रमुख नितीन पाटील,जिल्हा संघटक दत्ता हराळे,शेतकरी आघाडी संपर्कप्रमुख भारत पिंगळे,कामगार आघाडी संपर्कप्रमुख सुभाष गायकर आयटी जिल्हाप्रमुख शुभम देशमुख,नाशिक तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सहाने, इगतपुरी तालुकाप्रमुख नारायण भोसले,त्रंबकेश्वर तालुका प्रमुख संतोष मिंदे,दिंडोरी तालुका प्रमुख सचिन जाधव,मालेगाव तालुका प्रमुख अनिल निकम निफाड सतीश नवले,चांदवड ललित उशिरे,येवला गोरख संत,सिन्नर योगेश शिंदे,नांदगाव तालुका प्रमुख राकेश बोरसे,महिला आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख रेखाताई पाटील,जिल्हा संघटक रेखा जाधव,उद्योजक महिला आघाडी महानगरप्रमुख मीनाक्षीताई पाटील, उपमहा नगर प्रमुख रागिनी आहेर, चारुलता सूर्यवंशी,नाशिक तालुकाप्रमुख योगिता ढोकणे,आयटी महानगर प्रमुख काजल देवरे,दिंडोरी तालुकाप्रमुख नेहा नाठे,तालुका संपर्कप्रमुख मुक्ता बर्वे,रेणुका पेखळे,पूजा चव्हाणके,शुभांगी पेखळे आधी सह नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS