Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’मविआ’ला वंचित आघाडीचे बळ

आघाडीच्या बैठकीला अ‍ॅड. आंबेडकरांची उपस्थिती

मुंबई ः  गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार का, हा प्रश्‍न होता. कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वंचितल

कत्तलखाने पुन्हा सुरू होणार नाही, याची खबरदारी घ्या : नगराध्यक्ष वहाडणे
वैष्णोदेवीनंतर शाहरुख खान साईबाबांच्या नगरीत दाखल
उत्तरप्रदेशातील अपघातात चार मित्रांचा मृत्यू

मुंबई ः  गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार का, हा प्रश्‍न होता. कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वंचितला सहभागी होण्यासंदर्भात पत्र काढल्यानंतर आंबेडकरांनी आघाडीकडून विशेषतः काँगे्रसकडून मनाचे खेळ खेळले जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर या आघाडीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असतांना, मुंबईमध्ये हॉटेल ट्रायडन्ट येथे आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. चर्चेनंतर माध्यमांशी बोलतांना अ‍ॅड आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीची अवस्था इंडिया आघाडीसारखी होवू देणार नाही, आमच्यात काही मुद्यांवर एकमत झाले नाही तरी आम्ही आपल्या वाटा वेगळ्या वाटा करायच्या नाही असा निर्धार केला आहे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) व वंचित बहुजन आघाडी या घटकपक्षां बैठक झाली. या बैठकीला वंचितच्या प्रकाश आंबेडकरांसह इतर तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपशी दोनहात करण्याची रणनीती निश्‍चित करण्यात आली. तसेच काही झाले तरी मविआ फूटू न देण्याचा चंग बांधला. प्रकाश आंबेडकर काही कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी ही बैठक अर्धवट सोडून बाहेर पडले. त्यांना सोडण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बाहेर आले होते. इंडिया आघाडी आता शिल्लक राहिली नाही. सप व काँग्रेस हे दोनच पक्ष सध्या या आघाडीत शिल्लक राहिले होते. माझ्या माहितीनुसार, सपने उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ 11 जागा देऊ केल्यामुळे हे पक्षही वेगळ्या वाटेने निघालेत. इंडिया आघाडी आता अस्तित्वात नाही हीच वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आम्ही मविआतील घटकपक्षांनी शांततेत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केले.

’मविआ’ची गत ’इंडिया’सारखी होऊ देणार नाही – कोणत्याही स्थितीत महाविकास आघाडीची गत इंडिया आघाडीसारखी होवू देणार नसल्याचा आम्ही संकल्प केला आहे. त्यानुसार सर्वांनी ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्ष पुढील टप्प्यात जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा करतील. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यात आम्ही किमान समान कार्यक्रमावर चर्चा करत आहोत. ही चर्चा आज अर्धवट राहिली. त्यावर पुढील बैठकीत चर्चा होईल, असे वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.

जागावाटपांत रस्सीखेच सुरू – लोकसभा निवडणुका पुढील काही दिवसांवर येऊ घातल्या असतांना, महाविकास आघाडीमध्ये वंचितचा समावेश झाल्यामुळे जागावाटपांवर रस्सीखेच सुरू झाली आहे. वंचित आघाडीदेखील जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्या यासाठी प्रयत्नशील आहेत.  लोकसभेच्या 48 पैकी 34 जागांचा तिढा जवळपास सुटला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र उर्वरित 14 जागा मविआतून कोणते पक्ष लढणार, याबाबत अजूनही रस्सीखेच सुरू आहे.

COMMENTS