Homeताज्या बातम्यासंपादकीय

एसटी संपाचा बागुलबुवा

राज्यात सध्या एसटी बससेवा सुरळीत सुरू आहे. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीचा संप घडवून आणण्याचा प्रयत्न काही एसटी संघटनांनी चालवला होता. यातून स

साहित्यिकांचा रोष आणि पुरस्कार वापसी
राजकीय शक्तींचा नवा डाव
राजकारणातील घराणेशाही

राज्यात सध्या एसटी बससेवा सुरळीत सुरू आहे. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीचा संप घडवून आणण्याचा प्रयत्न काही एसटी संघटनांनी चालवला होता. यातून सर्वसामान्य प्रवाशांची कोंडी करण्याची हो योजना होती, त्यातून सरकारची कोंडी करायची हाच इरादा यानिमित्ताने दिसून येत होता. मात्र एसटी संघटनांच्या या संपाला एसटी कर्मचार्‍यांनी नकार देत एसटी बससेवा सुरळीत ठेवली आहे.

खरंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात, त्यानंतरही अनेक वर्ष ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. एसटी बस सेवा बंद ठेवण्यामागचे मुख्य कारण म्हणजे सातवा वेतन आयोग लागू करावा आणि एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीन करून, राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना मिळणारे वेतन आणि लाभ आम्हाला मिळावे ही एसटी कर्मचार्‍यांची मागणी होती. ती मागणी रास्त असली तरी, आजमितीस काही मागण्या अशक्य वाटतांना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने संपाची हाक दिली होती. सदावर्ते यांचे एसटी कर्मचार्‍यांना चिथावणी खोर वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत संपाची हाक देतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अनेकवेळेस संप पुकारून एसटी कर्मचार्‍यांचे नुकसानच झाले आहे. त्यामुळे ही दिवाळी तरी एसटी कर्मचार्‍यांची आंनदांची जावो, यासाठी एसटी कर्मचार्‍यांनी या संपाला नकार देत, बससेवा सुरळीत चालू ठेवल्या आहेत. त्यामुळे उद्या महाराष्ट्रात मी काय करतो, संपूर्ण महाराष्ट्र मी वेठीस धरू शकतो, अशी जे वल्गना करत होते, त्यांना एक प्रकारची चपराक बसली आहे. आपल्या स्वार्थासाठी, आपल्या राजकीय महत्वाकांक्षेपायी आणि मुख्य म्हणजे, आपण महाराष्ट्रात काहीही करू शकतो, असे जे दिवास्वप्न पाहत होते, त्यांना ही चपराक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी महाराष्ट्र वेठीस धरणे थांबवण्याची गरज आहे. लोकहित सर्वात प्रथम लक्षात घेणे गरजेचे आहे. तुमच्या मागण्या तुम्ही शांततेच्या मार्गाने सरकारपर्यंत पोहचवू शकतात, त्यासाठी भारतीय संविधानाने तुम्हाला अनेक आयुधे दिली आहे. त्या जोरावर तुम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन, करू शकतात. मात्र ऐन दिवाळीत संपाची हाक देवून तुम्ही महाराष्ट्र आणि सर्वसामान्य जनतेची कोंडी करू पाहत आहे, हे शोभणारे नाही. वास्तविक पाहता आज एसटी सेवेची नाळ ही खेड्या-पाड्यापर्यंत, वाड्या-वस्त्यांपर्यंत जोडलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील, खेड्यातील माणूस हा आजही एसटीनेच प्रवास करतो. त्याच्याकडे चारचाकी, गाड्या नाहीत. त्यामुहे अशा संपामुळे त्याची सर्वात मोठी गैरसोय होते. अशावेळी त्याची कोंडी करून प्रश्‍न सुटणार नाहीत. याचा फटका सदावर्तेंना बसणार नाही. कारण त्यांची एक गाडी काही आंदोलकांनी फोडल्यानंतर दुसर्‍याच क्षणाला त्यांच्या दिमतीला दुसरी आलिशान गाडी हजर असते, त्याचप्रकारे खेड्यापाड्यातील सर्वसामान्यांसाठी एसटी सेवा बंद झाली म्हणून दुसरी सेवा तात्काळ उभी राहणार नहाी. त्यामुळे कोंडी करणे हा पर्याय असू शकत नाही. एसटी कर्मचार्‍यांच्या अनेक समस्या आहेत, त्यांची पगारवाढ, त्यांना सातव्या वेतन आयोगाचे लाभ, वेळेवर पगार मिळणे, या सर्व बाबी आल्याच, त्यांच्याशी कोणताही महाराष्ट्रीयन व्यक्ती दुुमत असण्याचे कारण नाही. मात्र राज्यात आरक्षणाचा पेच यासह अनेक समस्या असतांना पुन्हा एकदा नवी समस्या उभी करून, महाराष्ट्राची प्रगती थांबवण्याचा इरादा असलेल्यांना या कर्मचार्‍यांनी चोख प्रतिउत्तर देत एसटी बस सेवा सुरळीत सुरू ठेवली आहे. 

COMMENTS