Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये ईव्हीएम मशीन कुर्‍हाडीने फोडले

मशीन फोडणार्‍या तरूणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड ः महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान होत असतांना नांदेड लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर एका तरूणाने ईव्हीएम मशीन क

कुमशेतमधील वीर धारेराव यात्रा उत्साहात
मविआचे भवितव्य जागा वाटपानंतरच होणार स्पष्ट
दहीहंडीमध्ये नातच असताना तरुणावर वार करत केला गोळीबार.

नांदेड ः महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान होत असतांना नांदेड लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर एका तरूणाने ईव्हीएम मशीन कुर्‍हाडीने फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर ही घटना घडली. या तरुणाने छोट्या कुर्‍हाडीने ईव्हीएम मशीन फोडले. भय्यासाहेब एडके असे तरुणाचे नाव आहे. यानंतर मतदान केंद्रावरील पोलिसांनी या तरुणाला तातडीने ताब्यात घेतले. या तरुणाने असे कृत्य का केले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
भैय्यासाहेब येडके असे या तरुणाचे नाव आहे. त्याने आपण हे कृत्य संविधान वाचवण्यासाठी केल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेमुळे मतदान केंद्रांवरील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. भैय्यासाहेब येडके नामक तरुण शुक्रवारी दुपारी रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी आला होता. त्याच्या जवळ कुर्‍हाड होती. ती त्याने लपवून आणली होती. त्याने मतदान करताना अचानक ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनवर कुर्‍हाडीने घाव घातले. या अनपेक्षित घटनेमुळे मतदान कर्मचारी व तिथे उपस्थित असलेल्या मतदारांची एकच घाबरगुंडी उडाली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक जगताप यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी तरुणाला ताब्यात घेतले. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नाही. पण पोलिसांनी बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. या घटनेनंतर येथील मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याची माहिती आहे. फुटलेल्या मशीनमध्ये जवळपास 500 मतदान झाले होते. पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्यामुळे हे मतदान सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS