शिवसेना पदाधिकार्‍यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना पदाधिकार्‍यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर तालुक्यातील जेऊर येथील शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे

पाऊस थांबला, विसर्ग घटला !
सत्कार्याच्या कार्याचा सत्कार होतो तेव्हा सेवेला बळ मिळते – प्राचार्य शेळके
अपूर्वा रोकडेची ज्युनियर कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर तालुक्यातील जेऊर येथील शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मोकटे हा पीडितेच्या घरी जाऊन बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत असे, जर तू कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना चाकूने मारून टाकीन अशी धमकी देत होता. त्या भीतीपोटी पीडित महिला गुन्हा दाखल करण्यास तयार होत नव्हती. मात्र, शनिवारी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने तिने अखेर गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. पिडीतेला फेसबुकवरून, मोबाईलवरून वारंवार त्रास देणे, अश्‍लील व्हिडिओ टाकणे तसेच घरी येऊन बळजबरीने त्रास देण्याचा प्रकार दोन वर्षे सुरू होता. मोकाटेविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याची पथके मोकाटेला अटक करण्यासाठी रवाना झाली आहे.

नगर पंचायत समितीच्या जेऊर-इमामपूर गणातील माजी सदस्य गोविंद अण्णा मोकाटे हा सन 2018 पासून फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होता. मी तीन वेळी रिक्वेस्ट नाकारली. त्यानंतर मोकाटे याने फेसबुकवर मेसेज करून माझे महत्वाचे काम आहे, असे सांगत मेसेज पाठवून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्याची विनंती केली. मी कोणी ओळखीचे असेल असे वाटल्याने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर वारंवार मला अश्‍लील मेसेज पाठविल्याने मी तो नंबर ब्लॉक केला. त्यानंतर मोकाटे याने माझ्या पतीशी ओळख वाढवून आपण खूप प्रवास करत असल्याने पाठ-कंबर दुखते, असे सांगून माझ्या घरी येऊन पतीकडून मसाज करून घेतला आणि ओळख वाढवली. पती घरी नसताना एके दिवशी घरी येऊन माझ्याबरोबर लगट करण्यास सुरुवात केली. मला धमकावत पतीला तुझी व माझी फेसबुक मैत्री असून संबंध असल्याचे सांगण्याची धमकी देत, माझे कोणी काही करू शकत नाही, माझे एका पक्षातील मोठ्या लोकांशी संबंध आहेत, असे धमकावत माझ्यावर माझ्या मनाविरोधात अत्याचार केला. त्यानंतर अशीच धमकी देत माझ्यावर अत्याचार करून धमकवण्यात आले. हा प्रकार असह्य झाल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने मी मोकाटे याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करत असल्याचे पीडित महिलेले तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, मोकाटे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

COMMENTS