Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपकडून चव्हाण, कुलकर्णी, डॉ. गोपछडेंना संधी

राज्यसभा निवडणूक ः काँगे्रसकडून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी

मुंबई ः राज्यसभेतील 56 जागांसाठी निवडणूक होत असून, यासाठी काँगे्रसकडून बुधवारी अनेक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यानुसार भाजपकडून अशोक चव्

लोणंदच्या कु. पायल जाधव हिला कराड येथे तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक
रोहित विकास मध्ये जबरदस्त हाणामारी Bigg Boss नं दाखवला थेट जेलचा रस्ता
शेत जमीन व्यवहार फसवणुक प्रकरणी महेश संचेतीवर कोतवालीतही गुन्हा दाखल

मुंबई ः राज्यसभेतील 56 जागांसाठी निवडणूक होत असून, यासाठी काँगे्रसकडून बुधवारी अनेक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यानुसार भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आणि प्रकाश जावडेकर हे तीन जण निवृत्त होत आहेत.

दुसरीकडे काँगे्रसने सोनिया गांधींना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोनिया गांधी यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येऊन चंद्रकांत हंडोरे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली आहे. त्यानंतर मुंबईचे महापौर,2004 मध्ये ते चेंबूर मतदारसंघातून आमदार ते, कॅबिनेट मंत्रीपद असा हंडोरंचा राजकीय प्रवास राहिला आहे. 2022 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. पहिल्या पसंतीचे उमेदवार असूनही त्यांच्या पदरी पराभव पडला होता. आता पक्षाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच (13 फेब्रुवारी) भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बुधवारी त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचबरोबर कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना 2019 मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती.

त्यानंतर त्या काहीशा नाराज होत्या. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडेही आपली तक्रार नोंदविली होती. राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने एकप्रकारे त्यांचे पुर्नवसन केल्याचे दिसत आहे. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले डॉ. अजित गोपछडे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपा संघटनेत काम करत आहेत. याआधी 2020 साली त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी घोषित केली होती. मात्र ऐनवेळी पक्षानेच त्यांची उमेदवारी मागे घेऊन रमेश कराड यांचे नाव पुढे केले होते. अजित गोपछडे हे डॉक्टर आहेत. नांदेडमधून भाजपाने दोन उमेदवार दिले आहेत. डॉ. अजित गोपछडे आणि अशोक चव्हाण हे दोन्ही नेते नांदेड जिल्ह्यातील आहेत. राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे भाजपाचे तीन, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचा प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार निवृत्त होत असले तरी पक्षातील फुटीमुळे या दोन्ही पक्षांना जागा मिळणार नाही.

चंद्रकांत हंडोरेंचा लागणार राजकीस कस – विधानसभेची सध्याची गणिते पाहता विजयी होण्यासाठी 40 चा कोटा आहे. विधानसभेत काँग्रेसचे 43 आमदार आहेत. त्यामुळे वरवर पाहता हंडोरेंसाठी सेफ गेम आहे. पण चव्हाणांनी काँग्रेसच्या आमदारांना स्वत:कडे वळवून घेतल्यास, चव्हाणांसाठी क्रॉस व्होटिंग झाल्यास हंडोरेंची वाट बिकट होऊ शकते. अशा परिस्थितीत त्यांना ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या शरद पवारांची मदत लागेल, त्यामुळे हंडोरेंचा राजकीय कस पुन्हा एकदा लागणार असल्याचे दिसून येत आहे.

शिंदेंच्या शिवसेनेकडून देवरांना संधी – भाजपने आणि काँगे्रसने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर बुधवारी शिंदेंच्या शिवसेनेने मिलिंद देवरा यांचे नाव राज्यसभेसाठी जाहीर केले आहे. देवरा यांना शिंदे गट दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती. परंतु, शिंदे गटाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS