Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमचा बोलवता धनी मराठा समाज मनोज जरांगेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

पुणे ः मराठा आरक्षणावरून राजकीय नेत्यांची वक्तव्ये सुरू आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अजून काही दिवस गेल्यानंतर मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे य

जामखेड तालुक्यात मनोज जरांगेंचे जल्लोषात स्वागत  
आरक्षणप्रश्‍नी महाराष्ट्र पिंजून काढणार ः मनोज जरांगे
एसीत बसणार्‍यांना आरक्षण कळणार नाही

पुणे ः मराठा आरक्षणावरून राजकीय नेत्यांची वक्तव्ये सुरू आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अजून काही दिवस गेल्यानंतर मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे यांच्यामागे आणखीन कोण आहे? त्यांचा बोलवता धनी कोण? हे स्पष्ट होईल असं म्हटले होते. मात्र मनोज जरांगे यांनी आमचा बोलवता धनी मराठा समाज असल्याचे प्रतिउत्तर राज ठाकरे यांना दिले आहे.
आमच्या पाठीमागे कोणीतरी असल्याचे आरोप आतापर्यंत खुप जणांनी केले आहेत. त्यामुळे आमच्या पाठी कोण आहे याचा शोध राज ठाकरेंनी घ्यावा आणि आम्हाला पण सांगावे. मराठा समाजाच्या पाठीमागे आम्हीच आहोत. आमचा बोलविता धनी मराठा समाजच आहे, अशा शब्दांत जरांगेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिल आहे. राज ठाकरे यांनी आधीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. आता मराठ्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यामुळे त्यांनी आम्हाला दिलेला पाठिंबा कायम ठेवावा अशी विनंती मी त्यांना करतो. लवकरच त्यांचे मतपरिवर्तन होईल. अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे. जरांगे पाटील यांनी जेजुरीमध्ये खंडेरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते बोलत होते. खंडेरायाकडे त्यांनी आरक्षणाला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे सर्वांना सुबुद्धी देण्याचे साकडे घातले.

COMMENTS