Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

पुणे : देशातील उत्तर भागात थंडीचा कडाका वाढतांना दिसून येत आहे. राजधानी दिल्ली, हरियाणामध्ये तापमान चांगलेच घसरल्याचे दिसून येत असून, तर काही राज

शिर्डी उपविभागातील 16 गुन्हेगार तडीपार
उदयनराजेंचे आंदोलन श्रेयासाठी ? 
जलयुक्त शिवार योजना घोटाळ्या प्रकरणी दोन कृषी सहाय्यकांसह चौघांना अटक | LOKNews24

पुणे : देशातील उत्तर भागात थंडीचा कडाका वाढतांना दिसून येत आहे. राजधानी दिल्ली, हरियाणामध्ये तापमान चांगलेच घसरल्याचे दिसून येत असून, तर काही राज्यांमध्ये पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे, मात्र त्याला अजून काही दिवसांचा अवधी आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. शनिवार पर्यन्त तापमानात 1 ते 2 अंशांनी घट होणार आहे. यानंतर तापमानात वाढ होणार आहे. आकाश मुख्यत: निरभ्र राहणार आहे, अशी माहिती पुणे वेध शाळेने दिली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून काही भागात पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी तापमानात देखील घट झाली होती. थंडी आणि ऊन आणि पाऊस असे परिस्थिती राज्यात होती. अरबी समुद्रात कमी दाबचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती.

COMMENTS