Homeताज्या बातम्यामनोरंजन

जळगाव च्या कार्यक्रमामध्ये सैराट फेम आर्चीला धक्काबुक्की

मुंबई : सैराट सिनेमातून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. सैराट सिनेमानंतर रिंकू राजगुरूला अनेक सिने

म्हसवडमध्ये धुवांधार पाऊस; जनजीवन विस्कळीत
पैशांची चोरी करताना दारूही केली लंपास
सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

मुंबई : सैराट सिनेमातून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. सैराट सिनेमानंतर रिंकू राजगुरूला अनेक सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. सोशल मीडियावर देखील रिंकू प्रचंड सक्रीय असते. सिनेमाचं शुटींग नसेल त्या वेळात रिंकू अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असते. अनेक ठिकाणीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील रिंकू राजगुरू हजर असते. अशातच नुकताच जळगाव येथे शासनाच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवात अभिनेत्री रिंकू राजगुरूनं हजेरी लावली होती. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला मात्र या कार्यक्रमात रिंकू राजगुरुला धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकारानंतर रिंकू राजगुरू चांगलीच भडकली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘सैराट’ सिनेमानंतर रिंकू राजगुरूची फॅन फॉलोविंग चांगलीच वाढली आहे. आजही तिला ‘सैराटची आर्ची’ याच नावानं ओळखलं जातं. आर्चीला पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. कोणत्याही कार्यक्रमात रिंकू आली आहे असं कळताच चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आणि तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. जळगावमधील सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर रिंकूला भेटण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी केली. जळगावातील कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. कार्यक्रमातून बाहेर येत असताना चाहत्यांनी रिंकू भोवती गर्दी केली. तिच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले. गर्दी दरम्यान रिंकू राजगुरुला धक्काबुक्की झाली.या प्रकारानंतर रिंकू राजगुरु चाहत्यांवर चांगलीच भडकली. “तुमच्या मुलीला कोणी धक्काबुक्की केल्यास तुम्हाला चालेल का? ” अशा शब्दात रिंकू राजगुरूने चाहत्यांना खडेबोल सुनावले. रिंकूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

COMMENTS