Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे यांच्या दौर्‍याचा चौथ्या टप्पा 1 डिसेंबरपासून

जालना / प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा राज्यभरात दौरे करणार आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यासंबधीच

कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार
मनोज जरांगे पाटलांनी लुटला क्रिकेटचा आनंद
सरकारने मराठा समाजाची फसवणूक ः मनोज जरांगे

जालना / प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा राज्यभरात दौरे करणार आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यासंबधीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौर्‍याची माहिती दिली. तसेच पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गाठी भेटी घेण्यासाठी ते पुन्हा दौरा सुरू करत आहे. 1 डिसेंबरपासून पुन्हा एकदा दौर्‍याला सुरूवात करणार आहेत.

मनोज जरांगे या दौर्‍याच्या चौथ्या टप्प्याला एक डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. विदर्भ आणि खानदेशमधील काही गावांना मनोज जरांगे भेट देणार आहेत. या दौर्‍याची सुरूवात जालन्यातून होणार आहे. पाचव्या टप्प्यात मनोज जरांगे हे कोकण दौरा करणार आहेत.

त्याचबरोबर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मनोज जरांगे नांदेड दौर्‍यावर असणार आहेत. त्यांच्या नांदेड जिल्ह्यामध्ये तीन सभा होणार आहेत. जरांगे यांची सर्वात मोठी सभा ही वाडी पाटी येथे पार पडणार आहे. वाडी पाटी येथे तब्बल 111 एकरात मनोज जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे.

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना एका नवीन मुद्द्यावरुन टार्गेट केले आहे. भुजबळांनी शिवसेनेत असताना, दलितांच्या मोर्चानंतर हुतात्मा स्मारक गोमुत्राने का शुध्द करुन घेतले होते? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

COMMENTS