Homeताज्या बातम्यादेश

मनीष सिसोदियांच्या कोठडीत 26 एप्रिलपर्यंत वाढ

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील तथाकथित दारू घोटाळाप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अटकेत असून, गुरूवारी राऊस व्हेन्यू कोर्टाने द

कान्होळा नदी परिसरातील जलपर्णी हटवली
शिर्डीत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर काँगे्रसचा मोर्चा
महाराष्ट्रात दुर्लक्षित, केंद्रात मजबूत ! 

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीतील तथाकथित दारू घोटाळाप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अटकेत असून, गुरूवारी राऊस व्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 26 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. राऊस व्हेन्यू कोर्ट या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 एप्रिल रोजी 11 वाजता करणार आहे. ज्या कागदपत्रांची तपासणी झाली नाही, त्या कागदपत्रांची यादी जमा करावी, असे निर्देश कोर्टाने सुनावणीदरम्यान दिले आहेत.
न्यायालयाने यापूर्वी आपचे नेते सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ केली होती. सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना त्यांचे वकील मोहित माथुर यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. या प्रकरणाची चौकशी करण्यात जाणून बुजून उशीर केला जात आहे. याच प्रकरणातील अजून एक आरोपी बेनॉय बाबू याच्या जामीन याचिकेचा हवाला देताना वकील माथुर म्हणालेत की, सिसोदिया हे आता कोणत्या मोठ्या पदावर नाहीत. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सिसोदिया यांच्या भूमिकेची ईडी आणि सीबीआय दोन्ही चौकशी करत आहेत. दिल्ली दारू धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार झाल्याचा दावा ईडीने केलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्याचे मुख्य सूत्रधार आहेत. केजरीवाल यांच्यासह ’आप’चे अनेक नेते आणि मंत्रीही या संपूर्ण प्रकरणात अडकले आहेत. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयाने आपचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ केली. केजरीवाल यांना केंद्रीय तपास यंत्रणेने 21 मार्च रोजी अटक केली होती. दुसरीकडे ईडीच्या आरोपावर टीका करताना ’आप’ ने म्हटले की, बदल घेण्याच्या हेतूनेच ही कारवाई करण्यात येत आहे, जनता याचे उत्तर देतील.

COMMENTS