आझादी का अमृत महोत्सव निमित्त कायदेविषयक जनजागृती रॅलीचे उद्घाटन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आझादी का अमृत महोत्सव निमित्त कायदेविषयक जनजागृती रॅलीचे उद्घाटन

 जामखेड प्रतिनिधी  स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त जामखेड तालुका विधी सेवा समिती , वकील संघ ,सतरा महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी अहमदनगर-जाम

*’सामनाचा ‘सामना’ कसा करायचा ते पुढे ठरवू’: नाना पटोले | सुपरफास्ट २४ | LokNews24*
सोनेवाडी विविध कार्यकारी सोसायटीवर पांडुरंग काळे व संपत दळवी बिनविरोध
शिष्यवृत्ती…शिक्षण आणि जुळले प्रेमही…

 जामखेड प्रतिनिधी 

स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त जामखेड तालुका विधी सेवा समिती , वकील संघ ,सतरा महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी अहमदनगर-जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने कायदेविषयक जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून एन सी सी च्या रॅली चे उद्घाटन जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश  रजनीकांत जगताप यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. 

माननीय सर्वोच्च न्यायालय राष्ट्रीय विधी सेवा समिती, उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा समिती यांच्या मार्गदर्शनाखाली २ ऑक्टो गांधी जयंती व १४ नोव्हेंबर  बाल दिवस या काळात कायदेविषयक उपक्रम जामखेड तालुक्यात विविध ठिकाणी  होणार आहेत. 

यावेळी प्रमुख उपस्थिती तहसीलदार योगेश चंद्रे ,गट विकास अधिकारी पोल पी एल, वकील बारचे अध्यक्ष संग्राम पोले, प्राचार्य अविनाश फडके  प्राचार्य मडके बी के , प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्यध्यपक तांबे पी एन, पर्यवेक्षण साळवे डी एन., एडवोकेट कोल्हे जे एम, पाटील व्ही वाय,ढाळे सी ए ,सरकारी अभियोक्ता नागरगोजे,जयभाय पी व्ही,गोले पी व्ही,राऊत पी.के, अमीर पठाण,बोलभट पी बी, बोरा एस एन ,एनसीसीचे गौतम केळकर, एस.ओ-अनिल देडे,टी ओ-मयूर भोसले, प्रा रमेश बोलभट,प्रा विनोद सासवडकर  विधी वरिष्ठ लिपिक विनोद नाईकनवरे, दिपक बिडगर, सहाय्यक फौजदार शिवाजी भोस, पो कॉ धनराज बिराजदार, अरुण पवार विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

संपूर्ण देशभरामध्ये न्यायालय विधी समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन महिनाभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल देडे व आभार मयुर भोसले यांनी केले.

COMMENTS