Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंब्याची रोपे तसेच ट्री गार्ड वारी ग्रामपंचायतीला सुपूर्त

गोदावरी बायोरिफायनरीज लि.चा पुढाकार

कोपरगाव ः वृक्ष हा सुदृढ पर्यावरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. वृक्ष लागवड, संवर्धन आणि संरक्षण त्याचबरोबर वातावरण बदलामधील त्याचे सकारात्मक कार्य

अकोलेच्या मातीसाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत काम करणार – माजी खा. वाकचौरे
तरूणाच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार
बनावट व भेसळयुक्त कांदा बियाण्यांची विक्री
Displaying Kopargaon Godavari Rifayari News.jpg

कोपरगाव ः वृक्ष हा सुदृढ पर्यावरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. वृक्ष लागवड, संवर्धन आणि संरक्षण त्याचबरोबर वातावरण बदलामधील त्याचे सकारात्मक कार्य अधोरेखित करण्यासाठी तालुक्यातील वारी साकरवाडी येथील सोमैया उद्योग समूहाच्या गोदावरी बायोरिफायनरीज  लिमिटेड या प्रकल्पाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामपंचायत वारी येथे 1000 केशर आंब्याचे रोपे तसेच 150 वृक्ष संरक्षक जाळी (ट्री-गार्ड) देण्यात आले. ही सर्व झाडे जगून हिरवीगार राहावे यासाठी त्या झाडांची संरक्षण संवर्धना करण्याची गरज आहे या करीता संचालक सुहास गोडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
            वारी येथे सोमैया उद्योग समूहाचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठा प्रकल्प आहे.  सोमैया उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. समीर सोमैया यांच्या संकल्पनेतून परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगाराची उपलब्धी झाली आहे तसेच संचालक श्री. सुहास गोडगे यांच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सामाजिक कार्य सुरू असतात. पर्यावरण संवर्धनासाठी तर नेहमीच पुढाकार असतो. 1972 सालापासून या प्रकल्पात पर्यावरण दिन सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या सप्ताहाच्या माध्यमातून दरवर्षी लाखो झाडांची लागवड करून संवर्धन करण्यात येते. गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी च्या वतीने संचालक सुहास गोडगे यांच्या हस्ते केशर आंब्याची रोपे तसेच ट्री गार्ड ग्रामपंचायत वारी यांना सुपूर्त करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच योगिताताई बद्रीनाथ जाधव, उपसरपंच विजय गायकवाड, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडीचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील, पर्यावरण अधिकारी सूरज वाणी, विजय थोरात तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

पर्यावरण संतुली समृद्ध गाव करण्याकरीता रोपांचे संरक्षण व संवर्धनासाठी लोखंडी ट्री गार्ड अतिशय उपयुक्त ठरणार असून सोमैया उद्योग समूहाचे आमच्या गावातील विविध उपक्रमांसाठी नेहमीच सहकार्य असते.
योगिताताई बद्रीनाथ जाधव, सरपंच वारी

COMMENTS