Homeताज्या बातम्यादेश

इस्रो पुढील महिन्यात घेणार सूर्याकडे झेप

नवी दिल्ली ः भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने चांद्रयान-3 मोहीम फत्ते केल्यानंतर इस्रोने आता पुढील मोहिमेची तयारी सुरू केली असून इस्त्

पावसाळ्यापूर्वी कास तलावाच्या सांडव्याचे काम पूर्ण
चांद्रयान-३ चंद्रावर यशस्वीपणे उतरलं
झुकरबर्गच्या मेटा कंपनीला धकका; गुंतवणुकदार चिंतेत

नवी दिल्ली ः भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने चांद्रयान-3 मोहीम फत्ते केल्यानंतर इस्रोने आता पुढील मोहिमेची तयारी सुरू केली असून इस्त्रोचे पुढील मिशन आता मिशन आदित्य आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो आता पुढील महिन्यात आदित्य एल 1 ला अंतराळात पाठवणार आहे.
चंद्राला काबीज केल्यानंतर आता इस्रो एक नवा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. ते म्हणजे मिशन आदित्य. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोचे आदित्य एल 1 हे यान सप्टेंबर महिन्यात सूर्याकडे झेपावणार आहे. या मिशनची सर्व तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून आदित्य एलची असेम्ब्ली आणि इंटिग्रेशन बंगलोरच्या यू.आर. राव सॅटॅलाइट सेंटरमध्ये करण्यात आलीय. सप्टेंबर महिन्यात झडङत रॉकेटच्या माध्यमातून आदित्य एल 1 सूर्याकडे झेपावेल. आदित्य एल 1 हे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावरील हॉलो ऑर्बिट लॉग रेंज पॉईंट 1 या ठिकाणी स्थिरावेल.

COMMENTS