Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई; आयपीएल सट्टेबाजीचं जाळं उद्ध्वस्त, ७ बुकी गजाआड!

नागपूर शहरात क्रिकेट सट्टेबाजीविरोधात पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. काल रात्री मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या

पुणे शहरात खंडणीप्रकरणात पीएसआयसह तिघांवर गुन्हा
राहुरीत गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळ्यात गोतस्करीच्या संशयावरून राडा गाडीची तोडफोड दोघांना मारहाण; आमदाराच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला

नागपूर शहरात क्रिकेट सट्टेबाजीविरोधात पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. काल रात्री मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या सात बुकींना पोलिसांनी अटक केली.
गुप्त माहितीच्या आधारे क्राईम ब्रँचने सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छावणी परिसरात छापा टाकला. यावेळी सट्टेबाज लॅपटॉप आणि वाय-फायच्या मदतीने ग्राहकांशी संपर्क साधून लाखो रुपयांची उलाढाल करत होते. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा तपास आता वेगाने सुरू आहे.

COMMENTS