भिंगारच्या ’त्या’ घटनेबद्दल नोंदवले 40 जबाब ; येत्या दोन-तीन दिवसात अहवाल अपेक्षित, पोलिस व नागरिकांचे लक्ष

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिंगारच्या ’त्या’ घटनेबद्दल नोंदवले 40 जबाब ; येत्या दोन-तीन दिवसात अहवाल अपेक्षित, पोलिस व नागरिकांचे लक्ष

अहमदनगर/ प्रतिनिधी- नगर शहराजवळील भिंगार कॅम्प परिसरात चार दिवसापूर्वी घडलेल्या एका घटनेबाबत पोलिसांनी तब्बल 40जणांचे जबाब नोंदवले आहे. येत्या दोन-ती

जामखेड शहरासह तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
समता चॅलेंजरने पटकावला करंडक व प्रथम पारितोषिक
सुरेशनगरमध्ये मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर उत्साहात

अहमदनगर/ प्रतिनिधी- नगर शहराजवळील भिंगार कॅम्प परिसरात चार दिवसापूर्वी घडलेल्या एका घटनेबाबत पोलिसांनी तब्बल 40जणांचे जबाब नोंदवले आहे. येत्या दोन-तीन दिवसात त्याचा अहवाल येणे अपेक्षित आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने पोलिसांच्या गाडीतून उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला व त्यात तो जखमी झाला तर पोलिसांची गाडी अडवून काहींनी त्याला बेदम मारहाण केल्याने तो जखमी झाला, अशा आशयाच्या दोन फिर्यादींमुळे यासंदर्भात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांची सुरू असून आत्तापर्यंत 40 हून अधिक जणांचे जबाब घेण्यात आलेले आहेत. दोन दिवसांमध्ये ही चौकशी पूर्ण होईल. दरम्यान या प्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यानंतर व अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबतची माहिती अशी की, पोस्कोच्या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी सादीक बिराजदार नगरमध्ये आल्यानंतर व भिंगार कॅम्प पोलिसांना त्याची माहिती मिळाल्यानंतर ते त्याला पकडण्यासाठी गेले होते. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी आरोपी बिराजदार याला पकडल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या दिशेने येत असताना त्याने पोलिसांच्या गाडी बाहेर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणासंदर्भात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये कलम 224 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तर त्याच दिवशी रात्री उशिराने आरोपी बिराजदार याची पत्नी रुक्सार यांनीसुद्धा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली व पाच आरोपींची नावे सांगून त्यांनी पोलिसांची गाडी अडवून माझ्या पतीला मारहाण केली व त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत तसेच संबंधित आरोपींच्या समवेत दोन पोलीस सुद्धा होते, असे त्यांनी या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. त्यानुसार भिंगार पोलिस ठाण्यामध्ये पाच जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या घटनेनंतर संबंधित आरोपी खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार घेत असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर पोलिस अधीक्षक पाटील यांनी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन येथे जाऊन या घटनेची माहिती घेतली व एकाच घटनेबाबत दोन वेगवेगळ्या फिर्यादी आल्याने व त्यावरून गुन्हेही दाखल झाल्याने त्यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहर विभागाचे पोलिस उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्यामार्फत ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. तिच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

चौकशीतून सत्य स्पष्ट होईल
या संदर्भामध्ये चौकशी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, जी काही घटना घडलेली आहे, त्या संदर्भातील चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. अजूनही दोन ते तीन दिवस ती चौकशी सुरू राहील. या चौकशीमध्ये जे काही सत्य असेल, ते पुढे येईल. कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी कोण-कोण होते त्यांचेसुद्धा जाबजबाब घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये दोन समक्ष असणारे साक्षीदारांची नावे असल्यामुळे त्यांचेही जवाब घेण्यात आलेले आहे. गेल्या तीन दिवसापासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

COMMENTS