Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा

मुंबई प्रतिनिधी - नवीन मोटर वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी आंदोलन पुराकले आहे. त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. ट्रक चालक संप

जेष्ठ पत्रकार सुधीरजी मेहेता यांचे निधन | LOKNews24
खा. विखेंना भोवणार अखेर ते इंजेक्शन?…
नवीन मुजामपेट येथील पंधरा लाखाचा रस्ता दोन लाखात बनविला

मुंबई प्रतिनिधी – नवीन मोटर वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी आंदोलन पुराकले आहे. त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. ट्रक चालक संपवार जाणार असल्याने इंधन तुटवडा निर्माण होऊ गाड्यांमध्ये इंधन भरता येणार नाही अशी भीती सर्वसामान्यांना वाटत आहे. याच भीतीने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांसमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रत्नागिरी, संभाजी नगर, लातूर, नागपूर, वसई-विरार नाशिकसारख्या शहरांमध्ये इंधन भरण्यासाठी सर्वसामान्यांच्या काही किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्यात. दुसरीकडे आज दादर भाजी मार्केटमध्ये या संपामुळे भाजांची आवाक कमी झाल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. या संपाचा फटका स्कूल बस, रुग्णवाहिकांनाही बसत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र असं असतानाच इंधन वाहून आणणाऱ्या टँकर चालकांबरोबरच ट्रक चालकांनी केलेला हा संप नेमका कशासाठी आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

सोमवारी नवी मुंबईमधील उलवे येथे बेलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी ट्रक चालक फारच आक्रमक झाले आणि त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली. बेलापूर महामार्ग रोखून धरण्याचा ट्रक चालकांचा डाव हाणून पाडला. एनआरआय पोलिसांनी शेकडो ट्रक चालकांना ताब्यात घेतलं. यानंतर पनवेल-सायन रस्ता ट्रक चालकांनी रोखल्याने वाहतूक कोंडी झाली. 

COMMENTS