Homeताज्या बातम्यासंपादकीय

महायुती काॅंग्रेसमय ! 

देशात एकूण ५५ जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका होत असल्या तरी, महाराष्ट्राच्या निवडणुकीचे मात्र वैशिष्ट्य वेगळे आहे. केंद्रात आणि राज्यात तसं पाहि

सुमार दर्जाचा ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या लायकीचा कसा ?
आरक्षणाच्या न्यायासाठी ओबीसींचे विभाजन आवश्यक !
जात्याभिमानींची फसवी वंश शुध्दी !

देशात एकूण ५५ जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका होत असल्या तरी, महाराष्ट्राच्या निवडणुकीचे मात्र वैशिष्ट्य वेगळे आहे. केंद्रात आणि राज्यात तसं पाहिलं तर, डबल इंजिनचे सरकार निश्चितपणे आहे. पण, यामध्ये आपण पाहिलं तर, राज्यसभेच्या निवडणुकीत जे उमेदवार दिले जात आहेत, ते सगळे उमेदवार एक तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या मधूनच आयात केलेले दिसतात. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे आहेतच; मिलिंद देवरा हे आता शिंदे गटाकडून उमेदवारी करत असले तरी ते पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत. त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे आताही ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. एकंदरीत राज्यसभेवर महाराष्ट्रातून जाणाऱ्या सहा सदस्यांपैकी चार सदस्य हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत! फक्त दोन उमेदवार डॉ गोपछडे आणि मेधा कुलकर्णी हे दोन सदस्य जर सोडले तर, बाकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाच भरणा यामध्ये दिसतो. राज्यात डबल इंजिनचे सरकार असूनही पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचेच लोक राज्यसभेवर पाठवता येत नाहीत. किंबहुना, सत्ताधारी महायुतीमध्ये सामील असलेल्या पक्षांचेही मूळ नेते त्यांना पाठवता येत नाहीत. अपवाद काँग्रेसचा आहे. प्रफुल्ल पटेल हे फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. एकंदरीत ही राजकीय परिस्थिती म्हणजे कशाही प्रकारचं राजकारण केलं तरीही, भारतीय जनता पक्षाला आपली मूळ माणसं निवडून आणता येत नाहीत, किंवा सत्तेत असलेल्या कोणत्याही पक्षाला आपली मूळ असलेली माणसं निवडून आणता येत नाहीत, हे या निवडणुकीचे खास वैशिष्ट्य आहे. सत्ताधारी राजकीय पक्षांना उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे. ही वेळ जनमानसात पक्षाचा तळ  असला तरीही राजकीय अपरिहार्यता जी असते ती, कशा तडजोडी करायला भाग पाडते, हे यामधून स्पष्ट होते. राज्यसभेच्या सदस्यांची संख्या दर दोन वर्षांनी एक तृतीयांश ने निवृत्त होते. त्यामुळे यावर्षी ५६ सदस्यांची मुदत संपत असल्यामुळे देशभरात या निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रात सहा जागा आहेत. अर्थात यामध्ये संख्याबळाचा जर विचार केला तर, महाविकास आघाडीला देखील दोन उमेदवार पाठवता आले असते. म्हणजे चंद्रकांत हंडोरे यांच्याबरोबर जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उर्वरित शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि छोटे पक्ष मिळून जर योजनाबद्ध पद्धतीने ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न झाला असता तर, महाविकास आघाडीच्याही पारड्यात दोन जागा निश्चितपणे आल्या असत्या. आता केवळ काँग्रेसच्या जागेवरच हे भागणार की, आणखी काही यामध्ये फेरफार होईल, ही एकंदरीत परिस्थिती आगामी काळात स्पष्ट होईल. परंतु, राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचं राजकारण हे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर रणनीती करीत असल्याने, या राजकारणात आता रंग भरत चालला आहे. शक्यतोवर ही निवडणूक बिनविरोध होण्याची अधिक शक्यता आहे. जर निवडणुका बिनविरोध झाल्या, तर, काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांची जी धाकधूक आहे, ती निश्चितपणे वाचेल.  त्याचबरोबर उर्वरित ज्या पक्षांकडे काही आमदार आहेत, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि उर्वरित एक-एक दोन-दोन आमदार असणारे पक्ष यांचीही भूमिका घेऊन जर राज्यसभा निवडणुकीमध्ये राजकारण केलं गेलं असतं तर, निश्चितपणे चुरशीच्या लढती लोकांना पाहायला मिळाल्या असत्या. परंतु, आपल्या पक्षाची मत फुटू नये, ती इतर उमेदवारांना मिळू नये आणि धक्का तंत्र या निवडणुकीतून बाहेर येऊ नये, यासाठी सर्वच पक्ष काळजी घेत आहेत. कारण लोकसभा निवडणुका या जवळ येऊन ठेपले आहेत. अशा वेळी पक्षाच्या आमदारांमध्ये जर फूट पडली तर, त्याचा आगामी निवडणुकीत लोकांच्या किंवा मतदारांच्या मानसिकतेवर परिणाम होईल, ही काळजी पाहता सर्वच पक्षांनी या निवडणुकींना चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न टाळण्याचे सध्या तरी दिसते आहे.

COMMENTS