Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महर्षी शाळेचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

सीबीएसई दहावी-बारावीच्या निकालात विद्यार्थी चमकले

कोपरगाव प्रतिनिधी ः केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड नवी दिल्लीचा सी.बी.एस.ई. बोर्डचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन यामध्ये कोकमठाण कोपरगाव येथील सं

राज्यपुरस्कृत आवास योजनेत जामखेड अव्वल
अहमदनगरमध्ये चार बांगलादेशी घुसखोरांना अटक
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी व मार्गदर्शन

कोपरगाव प्रतिनिधी ः केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड नवी दिल्लीचा सी.बी.एस.ई. बोर्डचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन यामध्ये कोकमठाण कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुलचा उत्कृष्ट निकालआला आहे. इ. 12 वी सायन्स विभागाची या वर्षीची ही 12 वी बॅच असून यात प्रथम क्रमांक भाग्यश्री भरत संघवी 83.6 टक्के, द्वितीय क्रमांक जिनेशा भरत संचेती 80.2 टक्के तर तृतीय क्रमांक अनुज सोपान जुंधारे  79.8 टक्के यांनी मिळविला आहे.
तसेच इयत्ता 10 वीची ही 17 वी बॅच असून यात प्रथम क्रमांक स्नेहल वाल्मीक खंडीझोड 97.6 टक्के द्वितीय क्रमांक वल्लभ भरत निंबाळकर 93.6 टक्के, तृतीय क्रमांक सार्थक लालचंद आव्हाड 93.21 टक्के, चतुर्थ क्रमांक प्रणव राजेंद्र काटे 93 टक्के तर पाचवा क्रमांक पार्थ प्रभाकर बारसे 92.8 टक्के यांनी मिळविला असून यासह 9 विद्यार्थी 95 टक्के गुणांच्या पुढे तर 32 विद्यार्थी 80 टक्के गुणांच्या पुढे गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती व विश्‍वस्त प. पु. रमेशगिरीजी महाराज, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलास कोते, सचिव अंबादास अत्रे, विश्‍वस्त भाऊ पाटील, रामकृष्ण कोकाटे, अ‍ॅड. अनिल जाधव, आशुतोष पानगव्हाणे, बाळासाहेब चव्हाण, अतुल शिंदे, शिवनाथ शिंदे तसेच विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पानसरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीरंग झावरे, व सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक जयप्रकाश पाण्डेय, व्ही. एस. परदेशी, संजय दिवटे, शिवप्रसाद घोडके, मेघराज काकडे, डॉ. रविंद्र कोहकडे, राहुल काशिद, सुरज तुवर, आनंद दळवी, नितीन वाकचौरे, कैलास कुलकर्णी, आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS