इस्लामपूर / प्रतिनिधी : संभू आप्पा बुवाफन यात्रेत चित्रकला प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने डॉफ अमोल कोल्हे यांचे तलवार देतानाच
इस्लामपूर / प्रतिनिधी : संभू आप्पा बुवाफन यात्रेत चित्रकला प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने डॉफ अमोल कोल्हे यांचे तलवार देतानाच चित्र होते. या चित्रासमोर उभा राहून आ. जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून तलवार घेण्याचा मोह आवरता आला नाही. ही तलवार घेताना पालिका निवडणुकीत आपल्या पाठीत खंजीर खुपसणार्यांची गय केली जाणार नाही. राज्यात राष्ट्रवादी विरोधात कोणीपण असुदेत सगळ्यांचा सातबारा आपल्याकडे आहे. त्यामुळे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करू, असे वचन तरी छत्रपती शिवाजी महाराज यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले तर नसेल ना.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे गृहक्षेत्र म्हणून इस्लामपूर नगरपालिका अशी ओळख आहे. मागील पाच वर्षाचा कार्यकाल सोडला तर तीन दशकाहून अधिक काळ आ. जयंत पाटील सांगतील तीच पूर्व दिशा अशीच या शहराची राजकीय स्थिती होती. मात्र, तत्कालीन युती सरकारच्या पाठिंबामुळे जयंत पाटील यांच्या विरोधकांना एकत्रित येण्यास सुरुवात झाली. पेठचे वनश्री नानासाहेब महाडिक, शिराळ्याचे माजी आ. शिवाजीराव नाईक, माजी आ. सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी एकत्र येऊन आ. जयंत पाटील यांना पर्याय म्हणून विकास आघाडीच्या माध्यमातून इस्लामपूर पालिका निवडणूक लढवली. याचे परिणाम म्हणून थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये आघाडीने बाजी मारत राष्ट्रवादीचा पराभव करीत निशिकांत पाटील यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान केले. 28 सदस्यांच्या सभागृहामध्ये आघाडीचे 13 राष्ट्रवादीचे 14 तर 1 सदस्य अपक्ष असे निवडून आले. अपक्ष दादासाहेब पाटील यांना थेट उपनगराध्यक्ष पदाची संधी देत पालिकेतील राष्ट्रवादीने सत्तेतील भागीदारी कायम राखत निर्णय प्रक्रियेत सहभाग कायम राखला होता.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी मतदार संघात पदाधिकार्यांशी, जनतेशी संवाद साधत आहेत. तुम्ही कुणीही घाबरू नका. राष्ट्रवादी पक्ष आणि मी तुमच्या पाठिशी आहे. आपण करेक्ट कार्यक्रम करू, असे आ. जयंत पाटील हे आश्वासन जनतेला देत आहेत.
COMMENTS