Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कडकनाथ महाघोटाळ्याच्या महारयत कंपनीच्या संचालकाला अटक

नागपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील शेकडो शेतकर्‍यांची कडकनाथ जातीच्या कोंबड्यांचे पालन आणि नंतर ते खरेदी करण्याच्या नावावर तब्बल 1.65 कोटी रुप

म्हसवड-हिंगणी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ठिय्या
शिष्यवृत्ती परीक्षेत सातारच्या ’पोदार इंटरनॅशनल स्कूलचा निरंजन तोरडमल महाराष्ट्रात प्रथम
तन्मय कुंभार याची एअर पिस्तुल खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

नागपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील शेकडो शेतकर्‍यांची कडकनाथ जातीच्या कोंबड्यांचे पालन आणि नंतर ते खरेदी करण्याच्या नावावर तब्बल 1.65 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार 4 वर्षापूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणी नागपूर शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीचा संचालक सुधीर मोहिते याला अटक केली होती. त्याला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्यभरात या कंपनीने 1500 हून अधिक शेतकर्‍यांना 500 कोटींहून अधिक रूपयांचा चुना लावल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
सुमारे 2 वर्षांपूर्वी मे 2020 मध्ये बजाजनगर पोलीस ठाण्यात महारयत अ‍ॅग्रो कंपनीचे संचालक सुधीर शंकर मोहिते, संदीप सुभाष मोहिते, हनुमंत जगदाळे आणि इतरांवर गुन्हा नोंदविला होता. कडकनाथ प्रजातीच्या काळ्या रंगाच्या कोंबडीच्या चिकनला मध्य भारतात विशेषत: मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठी मागणी आहे. 900 रुपये प्रति किलो असा चिकनच्या विक्रीचा दावा केला जात होता. यातून मोठे उत्पन्न मिळवून देण्याच्या आमिषाने शेतकर्‍यांची फसवणूक करण्यात आली. मात्र, गुंतवणूकदार शेतकर्‍यांकडून घेतलेले पैसेही परत दिले नाहीत.
अधिक पैशाच्या मोहात अडकून शहरातील 111 शेतकर्‍यांनी या कंपनीत एकूण 1.64 कोटी रुपये गुंतविले. आरोपींनी पैसे घेऊन व्यवसाय न सुरू करता फसवणूक केली. या प्रकरणी शेतकर्‍यांनी बजाजनगर पोलिसांत तक्रार दिली. याच धर्तीवर सांगली, पुणे, पालघर, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकमध्येही कंपनीने जाळे पसरवून अनेक शेतकर्‍यांची फसवणूक केल्याच्या तक्रार नोंदविण्यात आल्या होत्या.
दरम्यान, कोल्हापूरच्या एका प्रकरणात आरोपी कारागृहात बंद होते. हे प्रकरण प्रदीर्घ कालावधीपासून थंड बस्त्यात होते. बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने सुधीर मोहिते याला कोल्हापूरच्या तुरुंगातून प्रोडक्शन वॉरंटवर अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. महारयत कंपनीकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असेल. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिरुध्द पुरी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

COMMENTS